मंगळवार (०८ मार्च) रोजी इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची (England Tour Of West Indies) सुरुवात झाली आहे. या दौऱ्यातील पहिला सामना सर व्हिव्हिएन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा संघ ८ बाद २६८ धावा अशा स्थितीत आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) वेस्ट इंडिजचा गोलंदाज केमार रोच (Kemar Roach) याच्या शॉर्ट ऑफ लेंथच्या चेंडूला छोडण्याच्या प्रयत्नात आपली विकेट (Joe Root Clean Bowled) गमावून बसला आहे.
इंग्लंडच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज केमार रोच आला होता. त्याने षटकातील दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकला. फलंदाजी करत असलेल्या रूटला वाटले की, केमारचा चेंडू यष्टीच्या वरून निघून जाईल, त्यामुळे त्याने बॅकफूटला सरकत फक्त यष्टीला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा हा अंदाज चुकला. केमारचा चेंडू ऑफ स्टंपच्या वर लागला आणि रूट त्रिफळाचीत झाला. रूट १४ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने १३ धावा करून त्रिफळाचीत झाला.
२०२२मध्ये जो रूट सपशेल अपयशी
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस कसोटीतील ५ कसोटी सामन्यांमध्येही रूटला विशेष फलंदाजी प्रदर्शन करता आले नव्हते. त्याच्या वर्ष २०२२ मधील फलंदाजी आकड्यांवर नजर टाकायची झाल्यास, त्याला आतापर्यंत १०० धावाही करता आल्या नाहीत. त्याने आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळताना ५ डावांमध्ये फलंदाजी करताना केवळ ८२ धावा करू शकला आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ३४ धावा इतकी राहिली आहे.
https://twitter.com/Muja_kyu_Nikala/status/1501209735063818244?s=20&t=UDaOydZyyEKOV0Xj83-HPA
महत्त्वाचे म्हणजे, हाच रूट गतवर्षी अर्थात २०२१ वर्षात सर्वाधिक धावा करणारा कसोटीपटू राहिला आहे. त्याने १५ कसोटी सामने खेळताना १७०८ धावा केल्या होत्या.
इंग्लंडच्या संघाची पहिल्याच डावात दयनीय स्थिती
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवसाखेर २६८ धावा फलकावर लावल्या आहेत. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो एकाकी झुंज देतो आहे. त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पहिल्या दिवसाखेर नाबाद राहात १०९ धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने १७ चौकार ठोकले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स ४२ धावा करू शकला. इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी मात्र वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपुढे गुडघे टेकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक खेळला जाणार बदललेल्या नियमांनुसार, १ ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ कायदे
वाॅर्नचे खांदे कसे बनले मजबूत?, अश्विनने सांगितली द्रविडकडून ऐकलेली बालपणीची कहाणी
वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरचा हवेत सूर मारत एकहाती झेल, विश्वचषकातील ठरला सर्वोत्तम कॅच!