सचिन तेंडूलकर आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे. तो ज्या हाॅटेलमध्ये क्वारंटाईन आहे, त्या हाॅटेलच्या खोलीमध्ये तेंडूलकरसाठी मुंबई फ्रॅंचायझीने अविस्मरणीय सरप्राईज प्लॅन केले होते. ते सरप्राईज पाहून तेंडूलकर चकित झाला आहे. या व्हिडीओमध्ये सचिनच्या कारकिर्दीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सचिन तेंडूलकरने आपल्या अधिकृत आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा सर्व प्रवासाच्या आठवणी एका टेबलवर सजावून ठेवल्या होत्या.
सचिन (Sachin Tendulkar) हे सुंदर सरप्राइज पाहून भावनिक झाला होता. भारताच्या माजी कर्णधाराने हा व्हिडीओ शेअर करत लिहले की, हाॅटेलच्या खोलीत आलो, तेव्हा मला हे सगळे दिसले. याला आपण क्वारंटाइन टाइमलाइन म्हणू शकतो. मास्टर ब्लास्टरने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून विनोद कांबळी, सुरेश रैनासारख्या खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कांबळी जुन्या आठवणी पाहून म्हणाला की, काय चालले आहे मास्टर, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. चाहत्यांनी सुद्धा हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CbfSztOgYvV/
आयपीएल २०२२ चा पहिला सामना सीएसके आणि केकेआर या दोन संघांमध्ये शनिवारी(२६ मार्च) पार पडणार आहे. मुंबई संघ आपला पहिला सामना २७ मार्चला दिल्ली संघाविरुद्ध खेळणार आहे. आयपीएल इतिहासात मुंबई संघ सर्वाधिक वेळा चषक जिंकणारा संघ ठरला आहे. मुंबईने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. या हंगामात संघ सहावी आयपीएल ट्राॅफी जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहे.
मुंबई संघाने सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड या खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी संघात रिटेन केले आहे, तर इशान किशनला सर्वाधिक बोली लावत १५. २५ कोटींना विकत घेतले आहे.
मुंबई इंडियन्स संपुर्ण संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव (फलंदाज), डेवाल्ड ब्रेविस (फलंदाज), तिलक वर्मा (फलंदाज), रमनदीप सिंग (फलंदाज), राहुल बुद्धी (फलंदाज), अनमोलप्रीत सिंग (फलंदाज), ईशान किशन (यष्टीरक्षक फलंदाज), आर्यन जुयाल (यष्टीरक्षक फलंदाज), कायरन पोलार्ड (अष्टपैलू), डॅनियन सॅम्स (अष्टपैलू), संजय यादव (अष्टपैलू), टिम डेविड (अष्टपैलू), फॅबियन ऍलन (अष्टपैलू), अर्जुन तेंडुलकर (अष्टपैलू), हृतिक शोकीन (अष्टपैलू), जसप्रीत बुमराह (वेगवान गोलंदाज), जोफ्रा आर्चर (वेगवान गोलंदाज), टायमल मिल्स (वेगवान गोलंदाज), अर्शद खान (वेगवान गोलंदाज), जयदेव उनाडकट (वेगवान गोलंदाज), रिले मेरेडिथ (वेगवान गोलंदाज), बेसिल थंपी (वेगवान गोलंदाज), मयंक मार्कंडे (फिरकी गोलंदाज), मुरुगन अश्विन (फिरकी गोलंदाज).
महत्त्वाच्या बातम्या-
उद्घाटन सोहळ्याची भरून निघणार कसर! पहिल्या आयपीएल मॅचपूर्वी टोकियो ऑलिंपिक विजेत्यांचा सन्मान