---Advertisement---

Video: खेळपट्टीवर पाऊल ठेवताच पठ्ठ्याने पाडला धावांचा पाऊस, अवघ्या ३३ चेंडूत ठोकल्या ९१ धावा

On: रविवार, जून 5, 2022 8:08 PM
Alex-Hales
---Advertisement---

इंग्लंडचा फलंदाज ऍलेक्स हेल्स इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात सहभागी झाला नाही. बायो बबलचे कारण सांगून त्याने अचानकपणे स्पर्धेतून माघार घेतली होती, पण आता इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट स्पर्धेत मात्र त्याने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. हेल्सने नॉटिंघमशायरसाठी खेळताना डर्बीशायरविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूत ९१ धावा ठोकल्या.

नॉटिंघमशायर आणि डर्बीशायर यांच्यातील हा सामना शुक्रवारी (३ जून) खेळला गेला. नॉटिंघमशायरने या सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यांचा महत्वाच फलंदाज ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याचे प्रदर्शन या सामन्यात सर्वोत्तम ठरले. सलामीसाठी आलेल्या हेल्सने अवघ्या ३३ चेंडूत ९१ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. म्हणजेच हेल्सने चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच ७८ धावा केल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ऍलेक्स हेल्सला खरेदी करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये खर्च केले होते. मात्र, आयत्या वेळी त्याने स्पर्धेतून माघार घेतली. या निर्णयामागे त्याने बायो बबलचे कारण सांगितले होते. तसेच त्याला स्वतःच्या कुटुंबापासून देखील लांब राहावे लागेल म्हणून त्याने आयपीएलमध्ये सहभाग घेतला नाही. हेल्सने माघार घेतल्यानंतर केकेआरने ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार ऍरॉन फिंचला संघात सहभागी केले.

दरम्यान, नॉटिंघमशायर आणि डर्बीशायर यांच्यातील या सामन्याचा विचार केला, नॉटिंघमशायरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डर्बीशायरने निर्धारित २० षटकांमध्ये १७८ धावा केल्या आणि सर्व विकेट्स देखील गमावल्या. प्रत्युत्तरात नॉटिंघमशायर संघाने ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १७.१ षटकात हे लक्ष्य गाठले. विजयात सर्वात महत्वाचे योगदान ऍलेक्स हेल्सचे राहिले. हेल्सने टी-२० ब्लास्टच्या या हंगामात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तरीदेखील इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात त्याला अद्याप पुनरागमन करता आले नाहीये. त्याने इंग्लंडसाठी शेवटचा सामना २०१९ मध्ये खेळला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारतीय पठ्ठ्या ‘रावळपिंडी एक्सप्रेस’लाही देणार टक्कर, म्हणाला, ‘मी मोडणार अख्तरचा विक्रम, पण…’

“जर गांगुलीने माझी साथ दिली नसती, तर त्याला कर्णधारपद सोडावे लागले असते”

एकट्या खेळाडूने नाही, तर संपूर्ण संघाने पटकावला होता ‘सामनावीर’ पुरस्कार, कसं ते घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---