हाँगकाँगविरुद्ध बुधवारी (31 ऑगस्ट) झालेल्या आशिया चषक 2022 मधील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने 40 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील आपली जागा पक्की केली. या सामन्यादरम्यान भारताकडून अष्टपैलू रविंद्र जडेजा याने शानदार क्षेत्ररक्षण केले. त्यातही त्याने हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खान याला धावबाद करण्यासाठी फेकलेला थ्रो नेत्रदिपक ठरला. या कमाल थ्रोला पाहून विराट कोहली याने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
भारताच्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगकडून (Hongkong vs India) निझाकत (Nizakat Khan) सलामीला फलंदाजीला आला होता. त्याने 12 चेंडूत 10 धावांची संघर्षमय खेळी केली. मात्र डावातील सहाव्या षटकात तो दुर्देवी ठरला. अर्शदीप सिंगच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर निझाकतने बॅकवर्ड पाँईटला साधारण शॉट मारला आणि तो एक धाव घेण्यासाठी पळाला.
परंतु येथे जडेजा क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. जडेजाने त्वरित आपल्याकडे येत असलेला चेंडू पकडला. हे पाहून धाव घेण्यासाठी क्रिज सोडून पुढे पळालेला निझाकत माघारी परतला. मात्र तोपर्यंत चपळ जडेजाने यष्ट्यांवर जोरदार थ्रो फेकला आणि तो अचूक यष्टीला जाऊन लागला आणि निझाकत धावबाद झाला. यावरून जडेजाने आणखी एकदा सिद्ध केले की, तो कमालीचा क्षेत्ररक्षक (ravindra Jadeja Throw) आहे.
सीमारेषेवर उभा असलेला विराट हा सर्व प्रसंग पाहात होता. त्याने जडेजाला अचूक थ्रो करताना पाहून विराट प्रभावित झाला. त्याने जडेजाकडे पाहात इशारा केला. विराटला (Virat Kohli) पाहून असे वाटत होते, जणू तो एका बोटाने गोट्या खेळतानाचा (Virat Kohli Reaction) इशारा करत आहे.
Ravindra singh Jadeja 🔥🔥🔥🤩🤩#RocketArm#IndvsHkg #AsiaCup2022 #jadeja @imjadeja pic.twitter.com/04Rd8mKilL
— Akash Pandey (@akashonpoint) August 31, 2022
Reaction of Kohli & Jadeja after the fantastic run-out. pic.twitter.com/VYwKHxti2j
— Johns. (@CricCrazyJohns) August 31, 2022