येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. आरसीबी आपले सामने घरचे सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळते. यावर्षीही या स्टेडियमवर मॅचेस होणार आहेत. मात्र तत्पूर्वी बंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
बंगळुरूमध्ये सध्या जलसंकट आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल स्पर्धेसाठी पाणीटंचाई मोठी समस्या बनू शकते. जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमध्ये खेळले जाणारे आयपीएल सामने दुसरीकडे हलवण्याचीही मागणी होत आहे. त्यामुळे या संकटात आता बंगळुरूमध्ये सामने होणार की नाही, हे जाणून घेऊया.
बंगळुरूमध्ये आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात एकूण तीन सामने खेळले जाणार आहेत. आरसीबी आपला पहिला सामना 25 मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध, दुसरा सामना 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणि तिसरा सामना 2 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळेल. हे सामने डोळ्यांसमोर ठेवून कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशननं स्पष्ट केलं आहे की, येथे खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या तीन सामन्यांवर पाण्याच्या संकटाचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण येथे स्टेडियमच्या सीवेज प्लांटमधील पाणी खेळपट्टी आणि आऊटफिल्डला पुरवलं जातं.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेंदू घोष म्हणाले की, “आम्ही सध्या कोणत्याही संकटाचा सामना करत नाही. आम्हाला राज्य सरकारकडून पाण्याच्या वापराबाबत माहिती मिळाली आहे. आम्ही मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यासाठी नियमित बैठका घेत आहोत.”
आम्ही तुम्हाला सांगतो की, बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळानं एक नोटीस जारी केली होती. यामध्ये बागकाम किंवा कार धुणे यासारख्या इतर कोणत्याही कारणासाठी पाण्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, सुभेंदू घोष यांच्या मते, ते स्टेडियममध्ये सांडपाणी वापरतील, जे पुरेसं आहे.
शुभेंदू घोष म्हणाले की, “आम्ही सीवेज प्लांटमधील पाणी आऊटफिल्ड, खेळपट्टी आणि इतर गोष्टींसाठी वापरत आहोत. आम्हाला सामन्यासाठी सुमारे 10 ते 15 हजार लिटर पाण्याची आवश्यकता असू शकते. आम्हाला विश्वास आहे की आम्ही ते सीवेज प्लांटद्वारे मिळवू. आम्हाला भूजल वापरावं लागणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 : मोठी बातमी! आरसीबीच्या नावात होणार बदल, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
अखेर ठरलं! IPL 2024साठी विराट कोहली ‘या’ दिवशी होणार आरसीबीच्या ताक्यात दाखल
रोहित शर्मा अजूनही त्याचा आयपीएल संघ बदलू शकतो का? ट्रान्सफर विंडोचे नियम काय सांगतात?