अॅडलेड। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर(9 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 49 षटकात 4 बाद 104 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजूनही 219 धावांची आवश्यकता आहे.
या सामन्यात आज जेव्हा आॅस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजा बाद झाला त्याआधी तो बाद होईल हे आॅस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू मार्क वॉने अचूक ओळखले होते. त्यांनी ख्वाजाच्या विकेटबद्दल समालोचन करत असताना अंदाज वर्तवला होता.
मार्क वॉ हे ख्वाजाचे क्रिकेट जवळून ओळखतात. त्यामुळे जेव्हा ख्वाजा बाद झाला त्याआधीची परिस्थिती पाहून त्यांनी हा अंदाज वर्तवला होता.
ख्वाजा जेव्हा 41 चेंडूत 8 धावांवर होता तेव्हा ते म्हटले होते की त्यांना तो अस्थिर वाटत आहे. विशेषत: तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध काहीतरी करु इच्छितो.
त्याचवेळी ख्वाजाने भारताचा फिरकी गोलंदाज अश्विनच्या गोलंदाजीवर 24 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चूकीचा फटका मारला. ज्यामुळे कव्हर क्षेत्राच्या दिशेला चेंडू उंच उडाला आणि रोहित शर्माने तो अचूक टिपला. ज्यामुळे ख्वाजाला त्याची विकेट गमवावी लागली.
Mark Waugh's commentary leading up to that dismissal…
Live coverage HERE: https://t.co/TMtG4y3RQz #AUSvIND pic.twitter.com/ZSAszFXeUM
— cricket.com.au (@cricketcomau) December 9, 2018
या सामन्यात दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा आणि पिटर हँड्सकॉम्ब यांनी स्वस्तात विकेट गमावल्या आहेत.
तसेच आॅस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाकडून अनेक दिग्गजांनी भारताविरुद्धची मालिका सुरु होण्याआधी चांगल्या खेळीची अपेक्षा केली होती. पण त्याने या सामन्यात निराशा केली आहे. तो पहिल्या डावात 28 धावांवर तर दुसऱ्या डावात 8 धावांवर बाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–गौतम गंभीरची ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीवर कठोर शब्दात टीका
–असा भीमपराक्रम करणारा विराट कोहली जगातील पहिलाच क्रिकेटपटू
–या कारणामुळे आॅस्ट्रेलियन संघाने आज हाताला बांधली काळी पट्टी