कॅमेरून ग्रीन आयपीएल 2023 मध्ये सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरलाय. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा हा फलंदाजी अष्टपैलू आगामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. त्याला खरेदी करण्यासाठी मुंबईने तब्बल 17.5 कोटी रुपये खर्च केले. दोन महिन्यांपूर्वी भारत दौऱ्यावर केलेल्या शानदार कामगिरीनंतर सर्वांची नजर त्याच्यावर पडली होती. मात्र, मुंबई इंडियन्स मागील तीन वर्षापासून त्याच्यावर नजर ठेवून होती, असा खुलासा मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी केला आहे.
कॅमेरून ग्रीन (Cameron Green) ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू असून आयपीएलमध्येही तो चांगली कामगिरी करू शकतो. मुंबई इंडियन्सने त्याला मोठी रक्कम खर्च करून संघात सामील केले असल्यामुळे त्याला पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. पहिल्याच हंगामात एवढी मोठी रकमेवरून ग्रीनच्या गुणवत्तेचा अंदाज लावता येऊ शकतो. लिलावात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स ग्रीनला खरेदी करण्यासाठी इच्छुक होते. दोन्ही फ्रँचायझींमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अखेर मुंबईने सर्वात मोठी बोली लावत या खेळाडूला संघात घेतले.
लिलावानंतर बोलताना मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी ग्रीनबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“ग्रीन एक जबरदस्त खेळाडू आहे. तो आमच्या संघात आल्याचा नक्कीच आनंद झाला. आम्ही मागील तीन वर्षापासून त्याच्यावर नजर ठेवून होतो. आम्ही वाट पाहत होतो की तो जेव्हा तो लिलावात येईल तेव्हा आम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू. सुदैवाने आम्हाला यात यश आले.”
ग्रीन हा सलामीपासून फिनिशर अशा कोणत्याही भूमिकेत अगदी योग्य बसणारा खेळाडू आहे. तसेच, तो 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. भविष्याचा विचार करता मुंबईने त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे.
(We Are Eyeing Cameron Green From Last Three Years Mumbai Indians Owner Reveal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे बरं नाही! चूक स्वत:ची अन् राग दुसऱ्यावर, विराटचा पंतवर आगपाखड करणारा व्हिडिओ पाहाच
IPL AUCTION: तडाखेबंद फलंदाज आणि मिस्ट्री स्पिनर! काश्मीरचा ‘फुल पॅकेज’ विवरांत बनला करोडपती