पुणे। बुधवारी (१३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने १२ धावांनी विजय मिळवला. पंजाबसाठी हा तिसरा विजय ठरला आहे. तर मुंबईचा पाचवा सलग पराभव ठरला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा निराश झालेला दिसला.
सामन्यानंतर रोहित (Rohit Sharma) म्हणाला की, मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने चांगला खेळ खेळला नाही. तो म्हणाला, ‘या सामन्यात हे शोधणे कठीण आहे की, आम्ही कुठे चूक केली. मला वाटते की आम्ही चांगला खेळ दाखवला होता, पण आम्ही विजय मिळवू शकतो नाही. आमचे खेळाडू धावबाद झाले, ज्यामुळे आम्ही अपेक्षित परिणामांपर्यंत पोहचू शकलो नाही. एका क्षणी आम्ही शानदारपणे पुढे जात होतो, पण आम्ही आमची लय कायम ठेवली नाही, याचे श्रेय पंजाब किंग्स ला जाते.’
रोहितने पुढे असेही म्हणाला की, ‘पंजाबच्या गोलंदाजांनी डावाच्या दुसऱ्या टप्प्याच चांगली गोलंदाजी केली. आम्ही या सामन्यात वेगळ्या विचाराने उतरलो होते. पण तो विचार सिद्ध झाला नाही. पण मी त्या खेळाडूंचे श्रेय अमान्य करू शकत नाही, ज्यांनी चांगली कामगिरी केली.’
मुंबई इंडियन्सला ५ विजेतेपद जिंकून देणारा कर्णधार रोहित पुढे म्हणाला, ‘आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाहीये. आम्हाला काही परिस्थिती समजून घ्याव्या लागतील. त्यानुसार आपल्या योजना अंमलात आणाव्या लागतील. आम्हाला पंजाबविरुद्ध चांगली सुरुवात मिळाली होती आणि त्यांनी आमच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचे काम केले. पण ही खेळपट्टी चांगली होती आणि येथे चांगली फळंदाजी करण्यासारखे वातावरण होते. मला वाटते १९८ धावांचे लक्ष्य साध्य करणे येथे शक्य होते. आम्ही आमच्या कामगिरीचे मुल्यमापन करून चांगल्या तयारीनिशी मैदानात उतरू.’
मुंबईचा आता पुढील सामना १६ एप्रिलला होणार असून लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
RR vs GT: राजस्थानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघ एक बदलासह अव्वलस्थानासाठी देणार झुंज
गतवर्षी पूर्णपणे फ्लॉप झालेले ‘हे’ क्रिकेटर्स, आयपीएल २०२२मध्ये करतायत धमाका; दिनेश कार्तिकही यादीत