fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या कारणामुळे आरसीबी जिंकत नाही आयपीएल ट्राॅफी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) हा आयपीएलच्या सर्व मोसमात खेळलेल्या संघांपैकी एक संघ आहे. मात्र आत्तापर्यंत त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यांनी 2009, 2011 आणि 2016 असे तीन वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र तिन्हीवेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

याबद्दल बोलताना आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की आरसीबीने किमान एकतरी विजेतेपद मिळवायला हवे होते. विराट आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन यांनी काल(2 एप्रिल) इंस्ट्राग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट केले होते. या चॅट दरम्यान त्यांनी आरसीबीला विजेतपद जिंकण्यात आलेल्या अपयशाबद्दल देखील चर्चा केली.

आरसीबीबद्दल विराट म्हणाला, ‘आम्ही तीनवेळा अंतिम सामन्यात पोहचलो. पण जिंकू शकलो नाही. आम्ही निदान एक विजेतेपद मिळवण्यासाठी पात्र होतो. आयरसीबीमध्ये आपण नेहमी अनेक स्टार्स असल्याबद्दल बोलतो. तूम्ही जेवढा विचार करता (आयपीएल विजेतेपदाबद्दल) तेवढेच ते दूर जाते. त्यामुळे दबाव वाढतो, पण आम्हाला खेळाचा आनंद घेण्याचा आणि दबाव न घेण्याची गरज आहे.’

याबरोबरच विराटने अनेक मोठे खेळाडू आरसीबीकडून आत्तापर्यंत खेळले असल्याचेही सांगितले. तसेच केविन पिटरसनही २००९आणि २०१० या दरम्यान आरसीबीचा भाग असताना केलेल्या मजा-मस्तीच्या आठवणींनाही उजाळा त्याने दिला.

विराट म्हणाला, ‘२००९ आणि २०१० पासून आपण आरसीबीमध्ये मजा-मस्ती केली. आपण पहिल्या दिवसापासून चांगले खेळत होतो. तू (पिटरसन) एक स्टार म्हणून संघात आला होता. तसेच संघात जॅक कॅलिस, मार्क बाऊचर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड असे स्टार खेळाडू होते.’

विराटने याव्यतिरक्त त्याला एमएस धोनी आणि एबी डिविलियर्सबरोबर फलंदाजी करायला आवडते, असेही सांगितले.

ट्रेंडिंग घडामोडी – 

भारताकडून केवळ १ कसोटी खेळलेला खेळाडू करतोय ३५० मजदूरांची मदत

आम्हीही विश्वचषक जिंकून दिलाय, आम्हालाही टॅग करा

तेव्हा धोनीला नको होता विराट टीम इंडियात, या खेळाडूला द्यायची होती विराटच्या जागी संधी

You might also like