fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तेव्हा धोनीला नको होता विराट टीम इंडियात, या खेळाडूला द्यायची होती विराटच्या जागी संधी

भारतीय संघातील यशस्वी कर्णधारांची नावे घेतली की चटकन एमएस धोनी किंवा विराट कोहलीचे नाव समोर येते. या दोनही खेळाडूंनी आपली संघातील उपयुक्तता सिद्ध केली आहे.

परंतु तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही की, एकेकाळी एमएस धोनीला विराट कोहली संघात नको होता. २०१८मध्ये भारतीय निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी यांचा खुलासा केला होता. When MS Dhoni didn’t want Virat Kohli to play for India.

२००८मध्ये विराट कोहलीच्या जागी तेव्हा कर्णधार एमएस धोनी व बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना सुब्रमन्यम बद्रिनाथ संघात हवा होता.

तेव्हा एमएस धोनी व नंतर प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना विराटच्या एकंदरीत गुणवत्तेबद्ल शंका होती. तेव्हा भारताच्या युवा संघाने तेव्हा ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, त्यात विराटने चांगली कामगिरी केली होती.

तेव्हा श्रीलंका दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात १९ वर्षाखालील २००८ विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना दिलीप वेंगसरकर यांना संधी द्यायची होती. वेंगसरकर यांनी या दौऱ्यासाठी कोहलीची निवड केली व त्यांना याची मोठी किंमत मोजायला लागल्याचे त्यांनी २०१८मध्ये सांगितले होते.

वेंगसरकर यांना काही महिन्यांतच नंतर निवड समितीच्या प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला व कृष्णमाचारी श्रीकांत यांची या पदावर निवड झाली.

तेव्हा बद्रिनाथ व विराट अशा दोघांचीही त्या दौऱ्याला संघात निवड झाली होती. विराटने १८ ऑगस्ट २००८ तर बद्रिनाथने २०ऑगस्ट २००८ रोजी वनडे पदार्पण केले.

सध्या विराट हा भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. तसेच पुढे तो भारतीय संघाचा सर्व प्रकाराचा कर्णधार झाला.

बद्रिनाथला मात्र भारताकडून २ कसोटी, ७ वनडे व १ टी२० सामना खेळण्याची संधी मिळाली. ३९ वर्षीय बद्रिनाथने काही महिन्यांपुर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like