fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आम्हीही विश्वचषक जिंकून दिलाय, आम्हालाही टॅग करा

भारतीय संघाने २ एप्रिल २०११ रोजी दुसऱ्यांदा वनडे विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय संगाने १९८३ साली ६० षटकांचा तर २०११ रोजी ५० षटकांचा विश्वचषक जिंकला.

गुरुवारी या घटनेला ९ वर्ष झाली. यामुळे सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी “सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ही गोष्ट तुम्हाला कायम आनंद देईल, जसा आम्हाला १९८३च्या संघातील सदस्यांना मिळाला होता.” असे ट्विट केले आहे. परंतु त्यांनी हा ट्विट करताना केवळ सचिन तेंडूलकर व सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला टॅग केले.

या ट्विटवर माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने एक मजाक करणारा ट्विट केला. “धन्यवाद सिनीयर. तुम्ही मला व माहीलाही टॅग करायला हवं होतं. आम्हीही संघाचे भाग होतो,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यावर शास्त्रींने कोट करत ट्विट केला आहे. “जेव्हा गोष्ट विश्वचषकाची येते तेव्हा तु ज्युनियर नसतो युवी. तु महान आहेस,” असे म्हटले आहे.

गुरुवारी सकाळीच एका मिडीयावर गौतम गंभीरने केवळ धोनीच्या षटकाराला २०११ विश्वचषकाचे श्रेय देण्यावरुन राग व्यक्त केला होता. युवराजने त्याच्या ट्वीटमधून गौतम गंभीरचीही फिरकी घेतल्याचे बोलले जात आहे. Yuvraj Singh takes a dig at Ravi Shastri for not mentioning him and MS Dhoni in World Cup tweet.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like