भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आगामी वनडे विश्वचषकात संघासाठी महत्वाचा फलंदाज ठरणार आहे. विराट मागच्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असून विश्वचषकातही त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा वर्तवली जात आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही आगामी वनडे विश्वचषकाआधी विराटकडून धावांची अपेक्षा असल्याचे बोलून दाखवले.
विराट कोहली (Virat Kohli) याने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात शतक ठोकले आणि आपला जुना फॉर्म पुन्हा मिळवला. तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळानंतर त्याने आंतरराष्ट्रीय शतक केल्यामुळे या शतकाचे महत्व क्रिकेटजगतामध्ये खूपच जास्त होते. या शतकानंतर विराटने आपला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आणि पुन्हा आधीप्रमाणे खेळू लागला. दरम्यानच्या काळात त्याने सहा आंतरराष्ट्रीय शतके केली. आगामी वनडे विश्वचषकात देखील विराट भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने विराटकडून विश्वचषकात चांगल्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
विरेंद्र सेहवाग नुकताच एका माध्यमावर बोलताना म्हणाला, “मला वाटते विराट कोहली विश्वचषकात अनेक शतके करेल आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरेल. 2011 विश्वचषक जिंकल्यानंतर आम्ही सचिनला (Sachin Tendulkar) जसे उचलले होते, तसे यावेळी संघ विराटला उचलून धरेल, अशी आशा आहे.”
विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
महत्वाच्या बातम्या –
SNBP Hockey । राऊंड ग्लास अकादमीचा २७ गोलने दणदणीत विजय, पहिल्याच दिवशी स्पर्धेत ६४ गोलांची नोंद
Asian Games 2023 । तजिंदरपालने सलग दुसऱ्यांदा जिंकले सुवर्ण, अविनाश साबळेनेही रचला इतिहास