उद्यापासून (२४ डिसेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला अहमदाबाद येथे सुरुवात होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणारा हा पहिला सामना असेल. दिवस-रात्र स्वरूपाचा हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. तत्पूर्वी, सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार विराट कोहलीने भारतीय गोलंदाजांचे कौतुक करत इंग्लंडला चेतावणी दिली आहे.
आमच्याकडे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण
भारतीय कर्णधार विराट कोहली तिसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकारांना सामोरा गेला. सामने विषयीचा अनेक प्रश्नांना त्याने दिलखुलासपणे उत्तरे दिली. खेळपट्टी, गुलाबी चेंडू व गोलंदाजांनी विषयी त्याने आपली मते मांडली. गुलाबी चेंडू व खेळपट्टीविषयी बोलताना तो म्हणाला, “येथे फिरकीपटू व वेगवान गोलंदाज दोघांना समान संधी असेल. चेंडूला चमक असताना व चेंडू कठोर असेपर्यंत वेगवान गोलंदाजांना मदत करेल. गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा अधिक स्विंग होतो. मात्र त्याविषयी आम्ही जास्त विचार करत नाही.”
भारतीय गोलंदाजांविषयी बोलताना विराट म्हणाला, “अनेक जण असे म्हणत आहेत की, गुलाबी चेंडूचा इंग्लिश गोलंदाजांना जास्त फायदा होईल. मात्र असे नाही. आम्ही त्यांना त्यांच्या देशात जाऊन देखील हरवले आहे. आमच्याकडे सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी सक्षम आहोत.”
भारतात होणारा दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना
अहमदाबाद येथे खेळला जाणारा मालिकेतील तिसरा सामना हा दिवस-रात्र स्वरूपाचा असेल. हा सामना भारतात होणारा केवळ दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतातील पहिला दिवस रात्र कसोटी सामना खेळला गेलेला. यामध्ये भारताला विजय मिळाला होता.
महत्वाच्या बातम्या:
माजी भारतीय दिग्गज बेदी यांची प्रकृती चिंताजनक, करण्यात आली बायपास सर्जरी
युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! मास्टर ब्लास्टर देणार फलंदाजीचं मोफत प्रशिक्षण, पाहा कसं ते






