मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारकडून औपचारिक मान्यता मिळाली आहे. लीगचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सोमवारी ही माहिती दिली. आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान शारजाह, दुबई आणि अबू धाबी येथे होईल.
गेल्या आठवड्यात सरकारने बीसीसीआयला तत्वत: मान्यता दिली. भारतात कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढत्या घटनांमुळे युएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. “आम्हाला लेखी मान्यता मिळाली आहे,” असे पटेल यांनी पीटीआयला सांगितले.
जेव्हा कोणतीही भारतीय क्रीडा संस्था परदेशात देशांतर्गत स्पर्धा घेते तेव्हा गृहमंत्रालय, परराष्ट्र व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता घ्यावी लागते. मंडळाच्या एका उच्च अधिकार्याने सांगितले की, “सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर आम्ही अमिराती क्रिकेट बोर्डाला सांगितले होते. आता आम्हाला लेखी मान्यता मिळाली आहे, लवकरच संघांना कळविण्यात येईल.”
20 ऑगस्टनंतर बहुतेक संघ युएईकडे रवाना होतील. जाण्याअगोदर 24 तासांच्या आत त्यांच्या दोन आरटी पीसीआर चाचण्या कराव्या लागतील. चेन्नई सुपर किंग्जचा संघ 22 ऑगस्ट रोजी रवाना होईल. त्यापूर्वी चेपॉक स्टेडियमवर एका छोट्या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
चिनी मोबाईल कंपनी व्हिवोबरोबरचा करार मोडल्यानंतर प्रायोजकत्व शोधण्यासाठीही बीसीसीआय सध्या धडपडत आहे. 440 कोटी रुपयांचा तो करार होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने नवीन मुख्य प्रायोजक होण्यासाठी रस दाखविला आहे. याशिवाय रिलायन्स जिओ, कोका-कोला, बिजू, अमेझॉन, ड्रीम 11 या कंपन्यांची नावेही समोर येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज