न्यूझीलंड संघाकडून वनडेनंतर कसोटी मालिकेतही भारताला व्हाईटवॉश मिळाला आहे. काल (2 मार्च) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात (NZ VS IND) दुसरा कसोटी सामना (2nd ODI) पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 7 विकेट्सने जिंकत 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0ने खिशात घातली आहे.
या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला, एका उत्कृष्ट संघाविरुद्ध पराभव स्विकारण्यास कुठलाही कमीपणा वाटत नाही.
विराटने म्हटले आहे की, या पराभवामागील कारण मान्य करण्यास कसलीही हरकत नाही. एका चांगल्या संघाकडून पराभूत होण्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. आम्हाला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. एकही नाणेफेक जिंकता आला नाही. याचबरोबर आम्ही पुन्हा त्याच चूका केल्या. त्यामुळे अशा परिस्थितीत विजयाची आशा निरर्थक होती.
‘आम्ही पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी शकलो नाही. आजच्या सामन्यातील पहिल्या डावात आम्ही सुरुवातीला चांगली फलंदाजी केली, पण पुन्हा त्याच चूका केल्या. मात्र, न्यूझीलंडने दमदार खेळ केला. त्यांनी चांगली गोलंदाजी केली,’ असे सांगत विराटने भारताची खराब फलंदाजी पराभवासाठी मुख्य कारण असल्याचे मान्य केले.
विराट संघातील फलंदाजांवर नाराज असल्याचे दिसून आले. “भारतीय फलंदाजांनी खूप चूका केल्या आणि न्यूझीलंडने आमच्यावर सातत्याने दबाव आणला.” असेही विराट यावेळी म्हणाला.
तसेच, भारताला दोन्ही कसोटी सामन्यात नाणेफक जिंकता आला नाही. यावर विराट म्हणाला की, नाणेफेक एक कारण असू शकते पण मी त्याचा विचार करत नाही. त्यावर आपले नियंत्रण नसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला उत्कृष्ट खेळण्यावर भर द्यावा लागतो. इथे त्याचा विचार करून चालत नाही. कसोटीत आम्ही चांगले खेळू शकलो नाही. यादरम्यान आम्ही काय चूका केल्या याचा अभ्यास करावा लागेल.
याचबरोबर संघाचा खेळातील कमीपणा मान्य करत विराट म्हणाला की, “भारतीय संघाने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पण कसोटी मालिकेत एक संघ म्हणून आम्ही चांगले खेळू शकलो नाही. आम्ही न्यूझीलंडला मोठे आव्हान देऊ शकलो नाही. या कसोटीत आम्ही चूका केल्या आणि त्या आम्हाला मान्य आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
–…म्हणून टीम इंडियाने जर्सी देऊन श्रीलंकेच्या ‘त्या’ खेळाडूचा केला सन्मान
–न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज म्हणतो विराटला चूका करताना पाहून खूप छान वाटले…
–तर कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार