भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध झालेली तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना शिखर धवनच्या नेतृत्वात हा भारताचा युवा संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवत आपला दुसरा संघही तितकाच मजबूत असल्याचे स्पष्ट केले. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने भारतीय संघाच्या याच खोलीवर महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने पत्रकार परिषदेत बोलताना भारताच्या संघाचे कौतुक करताना म्हटले, “मुख्य संघातही आमची भूमिका स्पष्ट आहे. भारतीय संघ ज्या प्रकारची प्रगती करीत आहे त्यानुसार मला वाटते की, आम्ही आणखी दोन संघ निवडूनही जगातील कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो.”
भारताकडून या मालिकेत तब्बल ७ खेळाडूंनी पदार्पण केले होते.
या मुलाखतीत पुढे बोलताना हार्दिक म्हणाला, “मला वाटते की आयुष्यात आपण पुढे चालत राहावे. अपयश आले तरी त्याचा आनंद साजरा करता आला पाहिजे. हा खेळाचा एक भाग असून, हे भरपूर काही शिकवतो.”
हार्दिक या तीन सामन्यांच्या मालिकेत प्रभावी कामगिरी करू शकला नाही. त्याने मालिकेत खेळलेल्या दोन डावात अनुक्रमे शून्य व १९ धावा केल्या. तसेच, तीन बळी मिळवण्यात त्याला यश आले.
भारताचे खेळत आहेत दोन संघ
भारतीय क्रिकेट संघाचे सध्या दोन संघ विविध खंडांमध्ये खेळत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील इंग्लंड दौऱ्यावरील संघात २४ तर, श्रीलंकेतील संघात २५ खेळाडूंचा समावेश आहे. तसेच, काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने या दोन्ही संघाचा भाग नाहीत. विशेष म्हणजे आयपीएलसारख्या प्रसिद्ध स्पर्धेमध्ये नेतृत्व करणारे केएल राहुल व संजू सॅमसन हे खेळाडू प्रमुख संघाचे नियमित सदस्य नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकाच्या कर्णधाराने लाईव्ह सामन्यात वापरले नकोसे शब्द, आयसीसीने दिली शिक्षा
प्रशिक्षक द्रविड यांचा आवडता बनला आहे ‘हा’ खेळाडू! सातत्याने अपयशी ठरूनही देतायत संधी