जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा जिंकण्याचे स्वप्न भारतीय संघाने शनिवारी (10 जून) जिवंत ठेवले. उभय संघांतील या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियन संघ 280 धावांनी आघाडीवर आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघ 3 बाद 164 धावांपासून पुढे फलंदाजीला सुरुवात करेल. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चौथ्या दिवसाच्या शेवटी अनुक्रमे नाबाद 44 आणि 20 धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. मात्र अखेरच्या दिवशी लंडनमधील हवामान कसे असेल याबाबत माहिती आता समोर येत आहे.
हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जातोय. सामना सुरू होण्याआधी चौथा व पाचव्या दिवशी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र, चौथ्या दिवशी कडक ऊन पडल्याने खेळपट्टी फलंदाजीला पोषक झाली. इंग्लंडच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
‘पाचव्या दिवशी हवामान ढगाळ राहील. पहाटेच्या सुमारास थोडा पाऊस पडू शकतो. मात्र, त्यामुळे खेळात कोणतीही बाधा येणार नाही. थोडाफार गारवा असल्याने गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. दुपारच्या सत्रात पाऊस होऊ शकतो. परंतु, हा केवळ पासिंग शॉवर असेल. यामुळे खेळ जास्त काळ थांबणार नाही.’
आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवसाची देखील व्यवस्था केली आहे. पाचव्या दिवशी एक तासापेक्षा जास्त खेळ पावसामुळे न होऊ शकल्यास सामना सहाव्या दिवशी जाईल. परंतु, अशी कोणतीही शक्यता दिसून येत नाही. भारत व ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ पाचव्या दिवशी सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतील. हा सामना जिंकून भारतीय संघ तसेच ऑस्ट्रेलिया संघ सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करणार आहे. मात्र, सामना अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येईल.
(Weather Report Of London Ahead WTC Final Last Day INDvAUS)
महत्वाच्या बातम्या –
रहाणे-विराटच्या खांद्यावर भारताला डब्ल्यूटीसी चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी! शेवटचा दिवस निर्णायक
कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोपणाऱ्या 5 भारतीयांच्या यादीत विराटचाही समावेश, पण ‘किंग’चा नंबर कितवा?