इंडियन प्रीमीयर लीगला जगातील श्रीमंत क्रिकेट लीग मानले जाते. आयपीएलमुळे आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी कोट्यावधींची कमाई केलेलीही दिसली आहे. अनेक खेळाडू रातोरात करोडपती झाले आहेत. पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी आयपीएलला आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय बनून राहिली आहे.
जर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत (पीएसएल) लिलाव प्रक्रिया सुरू झाली, तर कोणीही आयपीएल खेळणार नाही, असे वादग्रस्त विधान रमीज राजा यांनी केले आहे. ज्यावर सध्या क्रिकेटविश्वातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.
रमीज राजा (Ramiz Raja) इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले, ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नवीन पर्याय शोधण्याची आम्हाला गरज आहे. सध्या आमच्याकडे पीएसएल आणि आयसीसी निधीशिवाय दुसरे पर्याय नाहीत. पुढीलवर्षीच्या मॉडेलबद्दल मतमतांतरे आहेत, पण मला पीएसएलमध्ये लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची इच्छा आहे.’
‘आम्ही फ्रँचायझी मालकांबरोबर चर्चा करू. हा सर्व पैशांचा खेळ आहे. जेव्हा पाकिस्तानमध्ये क्रिकेटची आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हा पाकिस्तानची इज्जत पण वाढेल. पाकिस्तान क्रिकेटच्या अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे साधन पीएसएल आहे. जर आम्ही पीएसएलला लिलाव प्रक्रियेत घेऊन गेलो, फ्रँचायझी मालकांच्या पर्समधील रक्कम वाढवली, तेव्हा पाहू की कोण पीएसएल ऐवजी आयपीएल खेळेल,’ असे रमीज राजा म्हणाले.
याबरोबर रमीज राजा म्हणाले की, त्यांना पीएसएल (PSL) पूर्ण पाकिस्तानमध्ये आयोजित करायची आहे. तसेच पीएसएलमधील सामने घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर (होम आणि अवे) अशा पद्धतीने खेळवायचे आहेत. ज्यामुळे पीएसएलचा दर्जा सुधारेल.
रमीज राजा यांच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियातूनही विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांचे विधान हस्यास्पद असल्याचे म्हणले आहे. तर अनेकांनी त्यांच्या व्यक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
तसेच आयपीएल (IPL) आणि पीएसएलची तुलना करायची झाली तरी, आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू पीएसएलपेक्षा खूप जास्त आहे. आयपीएलची सध्याची ब्रँड व्ह्यूल्यू जवळपास ४.७ बिलियन डॉलरच्या आसपास आहे, तर पीएसएलची ३३० मिलियन डॉलर आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच पीएसएलचा ७ वा हंगाम संपला आहे, तर २६ मार्चपासून आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत अव्वलस्थानी, पण स्थान टिकण्यासाठी पाकिस्तानच्या विजयाची गरज; वाचा
कसोटी क्रिकेट झालं तब्बल १४५ वर्षांचं! कसा झाला होता सर्वात पहिला सामना, घ्या जाणून
‘मैं हारेगा नहीं साला’, माजी क्रिकेटरने पुष्पा स्टाईलमध्ये सांगितला कर्णधार रोहित शर्माचा इरादा