---Advertisement---

“ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सचिन-द्रविड यांना 2007 टी20 वर्ल्ड कप खेळण्याची विनंती…”, ललित मोदींचा खळबळजनक दावा

On: गुरूवार, जून 4, 2026 10:48 AM
Team India
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी असा दावा केला की 2007 च्या पहिल्या आयसीसी टी20 विश्वचषकात खेळण्यास अनेक स्टार भारतीय क्रिकेटपटू इच्छुक नव्हते, यासाठी त्यांनी इंग्लंड दौऱ्यात असलेल्या त्या खेळाडूंना स्वत: च भेटून स्पर्धेत खेळण्याचा आग्रह केला होता.

दक्षिण आफ्रिकेत सप्टेंबर महिन्यात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या काही दिवस आधी भारताचा इंग्लंड दौरा होता. हा दौरा 11 जुलै ते 8 सप्टेंबर 2007 या कालावधीत होता आणि टी20 विश्वचषक 11 सप्टेंबर रोजी सुरू होणार होते. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि सात वनडे सामन्यांची मालिका खेळणार होते. त्यासाठी संघात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांसारखे वरिष्ठ खेळाडू होते, तर टी20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात युवा खेळाडूंचा भरणा होता आणि त्यामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा सहभाग नव्हता. संघाचे नेतृत्व एमएस धोनीकडे होते, तर संघात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, आरपी सिंग, इरफान पठाण आणि इतर खेळाडूंचा सहभाग होता.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, अनेक खेळाडूंची क्रिकेटचे हे नवीन स्वरुप नाकारले असून प्रदीर्घ दौऱ्यानंतर स्पर्धेसाठी आपला मुक्काम वाढवण्यास इच्छुक नव्हते. अनेकांनी याला मुर्खपणाला खेळ म्हटले.

“जेव्हा 2007 मध्ये भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर होता, तेव्हा मी ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक खेळाडूकडे गेतो. मी जाऊन त्यांना म्हणालो, ‘कृपया, मी तुम्हाला टी 20 खेळण्याची विनंती करतो.’ ते म्हणाले, ‘ललित, तू मस्करी करतोयस का? हा कसला मूर्ख खेळ आहे? आम्हाला तो खेळायचा नाही.’ ड्रेसिंग रूममधले सगळेच मला हेच म्हणाला. ‘ अरे आमचा खूप मोठा दौरा झाला आहे. आम्हाला आमच्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करायचा आहे.’ आता, आज, पहिली गोष्ट म्हणजे जनता, दुसरी गोष्ट म्हणजे खेळाडू आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रशासक, एखादा खेळाडू विश्वचषाकत न खेळणे स्विकारतील का? मोठा गदारोळ होईल”, असे मोदी म्हणाले.

” बीसीसीआयने टी20 विश्वचषकासाठी मुख्य संघ पाठवलाच नाही. त्यांनी दुसरा संघ पाठवला. भारतात टी 20 क्रिकेटवर कोणाचाही विश्वास नव्हता. युवराज सिंगने सहा षटकार मारेपर्यंत दक्षिण आफ्रिकेतील टी20 विश्वचषकाला कोणतेही रेटिंग नव्हते. अगदी त्या दिवसांपर्यंत. मीच ते घडवून आणले होते. मी केवळ एवढेच म्हटले होते की, जो कोणी एका षटकात सहा षटकार मारेल किंवा सहा विकेट्स घेईल, त्याला मी प्रोत्साहन देईन. जेव्हा कोणीही काही घडवून आणायला तयार नव्हते, तेव्हा मी ते घडवून आणण्याचा प्रयत्न करत होतो. मी लोकांना पटवून देण्यासाठी जगभार फिरलो, कारण मला माहित होतो मी नक्कीच यशस्वी होईल, असेही मोदी यांनी पुढे म्हटले आहे.

युवराजच्या त्या स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील सहा षटकार आजही लोकांच्या आठवणीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---