भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झाल्याने तो दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकला आहे. या दौऱ्यासाठी जेव्हा संघ निवडला, तेव्हा त्याचा समावेश करण्यात आला होता. आता मात्र तो पूर्णपणे फिट नसल्याने संघातून त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्याजागी BCCI ने औकिब नबीची निवड केली आहे. आता आणखी एका खेळाडूच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
BCCI ने जेव्हा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला, तेव्हा संघात बुमराह आणि साई सुदर्शनचा सहभाग केला होता. त्याचबरोबर त्यांच्या फिटनेसच्या मंजुरीवर सर्वकाही अवलंबून असणार असेही सांगितले होते. ते खेळण्यास पूर्णपणे फिट असेल, तेव्हाच ते पात्र ठरतील अन्यथा त्यांना वगळण्यात येईल. असे बुमराहच्या बाबतीत घडले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा BCCI ने सुधारित संघ जाहीर केला. तेव्हाही सुदर्शनच्या नावापुढे स्टार असून त्याचा अर्थ तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.
सुदर्शनने 2025 मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 7 सामने खेळले असून त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, मात्र तरीही त्याला अनेक संधी दिल्या जात आहेत. तो अद्याप फिट घोषित झाला नसल्याने त्याच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच तो आज भारतीय संघासोबत श्रीलंकेला रवाना होण्याची शक्यताही कमी आहे.
भारताने या दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता, तो पुढीलप्रमाणे
शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन. (*फिटनेसवर आधारित)
श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
पहिला सामना – 15 ते 19 ऑगस्ट, 2026 (गॉल)
दुसरा सामना – 23 ते 27 ऑगस्ट, 2026 (कोलंबो)






