सिडनी। भारताने आज (५ मार्च) पहिल्यांदाच महिला टी२० विश्वचषकात अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा कारनामा केला आहे. याबद्दल भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले असून अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या या महिला टी२० विश्वचषकात आज भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला उपांत्य सामना रंगणार होता. मात्र हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
यानंतर विराटने भारतीय संघाला शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन. मुलींनो आम्हाला तूमचा अभिमान आहे. तूम्हाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.’
Congratulations to the Indian Women's team on qualifying for the @T20WorldCup final. We are proud of you girls and wish you all the luck for the finals. ???????????? @BCCIWomen
— Virat Kohli (@imVkohli) March 5, 2020
भारतीय महिला संघाने या विश्वचषकात साखळी फेरीतील सर्व ४ सामने जिंकून अ गटाच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता.
सध्या आज महिला टी२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात सुरु आहे. यांच्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळेल. या विश्वचषकाचा अंतिम सामना ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी मेलबर्न येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–इंग्लंडची कर्णधार म्हणते, टी२० विश्वचषकात ‘तो’ पराभव आम्हाला भोवला
–टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली…
–फायनलमध्ये प्रवेश केलेल्या टीम इंडियाची ७ टी२० विश्वचषकातील अशी आहे कामगिरी






