ऑक्टोबरमध्ये होणारा टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी वेस्ट इंडीज संघाने आपली तयारी सुरू केली आहे. तिसरे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पाहणारा वेस्ट इंडिज संघ पुढील दोन महिन्यांत १५ टी२० सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी वेस्ट इंडीजने एक अतिशय मजबूत संघ मंगळवारी (१८ मे) जाहीर केला.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकांसाठी आपला संघ निवडला असून यामध्ये ख्रिस गेल, आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो आणि कायरन पोलार्ड सारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या संघात अनेक युवा खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे, जे एकहाती सामना जिंकून देऊ शकतात. इतकेच नाही तर ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सलाही संघात स्थान मिळाले आहे.
वेस्ट इंडीज संघाने आपल्या १८ सदस्यीय संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंची निवड केली आहे. शेल्डन कॉट्रेल, शिमरोन हेटमायर, ओशान थॉमस, हेडन वॉल्श जूनियर यांनाही संघात स्थान मिळाले. मार्चमध्ये श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका खेळणार्या संघातील बहुतेक सदस्य पुढील तीन मालिकांमध्येही खेळताना दिसतील. या सर्व मालिकांसाठी संघाचे नेतृत्व कायरन पोलार्ड करेल.
आगामी मालिकांसाठी वेस्ट इंडिजचा संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, ड्वेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, फिडेल एडवर्ड्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील हुसेन, एव्हिन लुईस, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, केव्हिन सिन्क्लेअर, ओशान थॉमन आणि हेडन वॉल्श जूनियर.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक
सामना १- २६ जून, ग्रेनाडा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सामना २- २७ जून, ग्रेनेडा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सामना ३- २९ जून, ग्रेनेडा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सामना ४- १ जुलै, ग्रेनेडा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सामना ४- ३ जुलै, ग्रेनेडा राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक
सामना १- ९ जुलै, सेंट लूसिया
सामना २- १० जुलै, सेंट लूसिया
सामना ३- १२ जुलै, सेंट लूसिया
सामना ४- १४ जुलै, सेंट लूसिया
सामना ५- १६ जुलै, सेंट लूसिया
पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक
सामना १- २७ जुलै, बार्बाडोस
सामना २- २८ जुलै, बार्बाडोस
सामना ३- ३१ जुलै, गयाना
सामना ४- १ ऑगस्ट, गयाना
सामना ५- ३ जुलै, गयाना
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचा मोठा फॅन आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; म्हणतोय, ‘मला २०११ विश्वचषकातील विजयी षटकार आवडतो’
मागील वर्षी अंतिम ११ मधून वगळण्यात आल्याबद्दल पुन्हा एकदा ब्रॉडने केले मोठे भाष्य; म्हणाला…
बीसीसीआयने पाळला दिलेला शब्द; अजूनही उचलत आहेत ‘त्या’ खेळाडूंचा खर्च






