---Advertisement---

कॅरेबियन पॉवर! रोमॅरियो शेफर्डसमोर वर्ल्ड कप उपविजेता संघ ढेपाळला

On: सोमवार, ऑगस्ट 26, 2024 9:21 AM
---Advertisement---

वेस्ट इंडिजनं टी20 विश्वचषक 2024 च्या उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा टी20 सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यजमानांनी 30 धावांनी शानदार विजय नोंदवला.

वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक होता रोमॅरियो शेफर्ड. त्यानं 4 षटकांत अवघ्या 15 धावा देत आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम, रीझा हेंड्रिक्स आणि पॅट्रिक क्रुगर यांच्या तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

वेस्ट इंडीजनं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य दिले होतं. प्रत्युत्तरात, आफ्रिकेचा संघ केवळ 149 धावांवर गडगडला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. तरीही संघानं 20 षटकांत 6 गडी गमावून 179 धावांपर्यंत मजल मारली. कॅरेबियन संघासाठी शाय होपनं 22 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली. अखेरच्या षटकांत कर्णधार रोव्हमन पॉवेलनं 22 चेंडूत 35 धावा आणि शेरफेन रदरफोर्डने 18 चेंडूत 29 धावा ठोकल्या.

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. मात्र पहिल्या दोन-तीन विकेट पडल्यानंतर संघाची गाडी रुळावरून घसरली. सलामीवीर रायन रिकेल्टन (20) आणि रीझा हेंड्रिक्स (44) यांनी धडाकेबाज सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी 4.4 षटकांत 63 धावा जोडल्या. रायन रिकेल्टन बाद झाल्यानंतर पॉवर प्लेमध्ये 71 धावांवर दक्षिण आफ्रिकेला रीझा हेंड्रिक्सच्या रुपात दुसरा धक्का बसला. यानंतर कर्णधार मार्करम (19) आणि ट्रिस्टन स्टब्स (28) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. अशाप्रकारे संघ 19.4 षटकांत 149 धावांवर ऑलआऊट झाला.

हेही वाचा – 

पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीला राग अनावर, संघाला कानपिचक्या देत म्हणाला…
“जज करू नका…”, घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकनं मुलासोबत शेअर केला व्हिडिओ
पाकिस्तानच्या संघात मोठा फेरबदल, टी20 विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर नेतृ्त्वाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---