इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत बायो बबल भेदून कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बीसीसीआय या स्पर्धेचा दुसरा टप्पा खेळवण्याच्या प्रयत्नात आहे. यामध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वेळापत्रक अडथळा निर्माण करत होते. अशातच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत भाष्य केले आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचा आगामी हंगाम येत्या २८ ऑगस्टपासून ते १९ सप्टेंबरपर्यंत खेळवण्यात येणार होते. तसेच बीसीसीआय देखील इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे उर्वरित हंगाम १८ सप्टेंबरनंतर युएईमध्ये खेळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे बीसीसीआयने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करून तोडगा काढला आहे. (West Indies cricket board ready to change their schedule on bcci request)
बीसीसीआयने वेस्ट इंडिज क्रिकेटकडे कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. यावर वेस्ट इंडिज क्रिकेटने संमती दर्शवली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, रिकी स्केरीट यांनी क्रिकबझसोबत बोलताना म्हटले की, “विंडीज क्रिकेट बोर्ड कुठलाही अडथळा न निर्माण करता, इंडियन प्रीमियर लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात होईल ती मदत करण्यास तयार आहे.”
यानुसार, कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन येत्या, २५ ऑगस्टपासून ते १५ सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. ज्यामुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा १८-१९ सप्टेंबर पासून सुरू करणे शक्य होईल. यापूर्वी, कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा २८ ऑगस्ट पासून ते १९ सप्टेंबर पर्यंत खेळवली जाणार होती. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयामुळे बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे. तसेच आयपीएलचे आयोजन केव्हा आणि कुठे होणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआय तर्फे देण्यात आलेली नाही. तसेच अनेक खेळाडूदेखील या स्पर्धेच्या वेळेस आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात व्यस्त असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप फत्ते करण्यासाठी कर्णधार कोहलीने बनवला ‘हा’ मास्टरप्लॅन, वाचा
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ‘हे’ भारतीय शिलेदार बलाढ्य न्यूझीलंडचा उडवतील धुव्वा!
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय