कोविड-19 महामारीच्या काळात पैशाच्या लोभामुळे किंवा धाडसाच्या भावनेमुळे त्याचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेला नसल्याचे वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला. खरंतर तो परिस्थितीचा सामना करण्याचा एक प्रयत्न आहे.
बीबीसी स्पोर्टशी बोलताना होल्डरने (Jason Holder) सांगितले, “बर्याच लोकांना क्रिकेट परत सुरू व्हावं असं वाटत होतं. असे नाही की आम्हाला बळीचा बकरा व्हायचं होत. या उन्हाळ्यात आमचा ब्रिटनचा दौरा करण्याचा कार्यक्रम हा आधीपासूनच ठरलेला होता. जेव्हा आम्ही त्याच्या शक्यतांबद्दल चर्चा करत होतो, तेव्हा प्रत्येकजण त्याच्याशी सहमत होता. आता आम्ही येथे आहोत.”
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा (Corona Virus) व्यापक परिणाम झाला आहे. ब्रिटनमध्ये आजपर्यंत या व्हायरसमुळे 40,000 हून अधिक लोक मरण पावले आहेत, तर दुसरीकडे कॅरेबियन देशांमध्ये फारच थोड्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत.
विंडीज संघ पैशासाठी दौरा करत नाही
होल्डर म्हणाला की, येथे येण्याचे कारण म्हणजे पैसे नाहीत. आणि ते आरोग्याशी तडजोड करणार नाही. तो म्हणाला, “आमच्यासाठी हा पैशाशी संबंधित मुद्दा नाही. आम्हाला सुरक्षा हवी आहे. आणि आमच्यासाठी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे.”
“आपण स्वत: ला एखाद्या आरोग्य कर्मचारी किंवा या कठीण परिस्थितीत काम करणार्या व्यक्तीच्या जागी ठेवून बघा. त्यांना यावेळी घरात बसण्याची किंवा व्हायरसपासून दूर राहण्याची संधी मिळाली नाही. आपण भाग्यवान आहोत, की आपण त्या स्थितीत नाही. पण काही वेळेस आपल्याला परिस्थिती सर्वसाधारण स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील,” असेही होल्डर पुढे म्हणाला.
ब्रिटन येथे क्वारंटाईनमध्ये आहे वेस्ट इंडीज संघ
वेस्ट इंडीजचा संघ ब्रिटनमध्ये आल्यानंतर ओल्ड ट्रॅफर्ड येथे क्वारंटाईन (Quarantine) आहे. संघ तीन आठवड्यांसाठी येथे सराव करेल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) व्यवस्थेमुळे होल्डर प्रभावित झाला आहेत.
“माझ्या निवासस्थानावर मोठ्या संख्येने सॅनिटायझर्स, युज अँड थ्रोचे हातमोजे आणि थर्मामीटर उपलब्ध आहेत. तुम्हाला अशा गोष्टींपासून आराम मिळतो. तुम्ही अधिक सहजपणे जगता. जर अशा गोष्टी घडल्या नाहीत, तर काळजी वाटते की ते खरोखर सुरक्षित आहेत काय?,” असेही तो पुढे म्हणाला.