---Advertisement---

वेस्ट क्रिकेटचा पुढील चार महिन्यांचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ संघांशी करणार दोन हात

On: शुक्रवार, मे 14, 2021 8:42 PM
---Advertisement---

कोरोना महामारीमुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा काहीशा मंदावल्या आहेत. बायो बबल मध्ये स्पर्धा होत असल्याने दीर्घकाळाच्या मालिकांचे आयोजन करावे लागते आहे. मात्र या कशाचाही परिणाम वेस्ट क्रिकेटच्या नियोजनावर झाला नाही आहे. पुढील चार महिन्यांसाठीचा वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा भरगच्च कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्याची घोषणा केली.

जून महिन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या वेस्ट इंडिज दौर्‍याने याचा प्रारंभ होईल. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ तसेच पाकिस्तानचा संघ देखील वेस्ट इंडिजचा दौरा करतील. चला तर जाणून घेऊया वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे पूर्ण वेळापत्रक –

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिज दौरा 
दक्षिण आफ्रिकेचा संघ जून महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करेल. यात दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि पाच टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यातील पहिली कसोटी १० जून तर दुसरी कसोटी १८ जूनपासून खेळवली जाईल. २६ जूनपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. अनुक्रमे २६, २७ आणि २९ जून आणि १ व ३ जुलैला टी२० सामने खेळवले जातील.

ऑस्ट्रेलियन संघाशी करणार दोन हात
दक्षिण आफ्रिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करेल. ऑस्ट्रेलियन संघ या वेस्ट इंडिज दौऱ्यात केवळ मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. ज्यात पाच टी२० आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा समावेश असेल. यातील टी२० सामने अनुक्रमे ९, १०, १२, १४ आणि १६ जुलै रोजी खेळवले जातील. तर वनडे सामने २०, २२ आणि २४ जुलैला खेळवण्यात येतील.

पाकिस्तानी संघही करणार वेस्ट इंडिजचा दौरा
ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यावर पाकिस्तानी संघ वेस्ट इंडिज दौर्‍यावर येईल. यात पाकिस्तानचा संघ पाच टी२० आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजशी दोन हात करेल. २७, २८, ३१ जुलै आणि १ व ३ ऑगस्ट रोजी टी२० सामने खेळवले जातील. तर १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान पहिला कसोटी सामना आणि २० ते २४ ऑगस्ट दरम्यान दुसरा कसोटी सामना पार पडेल.

महत्त्वाच्या बातम्या-

दुखापतींमुळे कारकिर्दीचे नुकसान झाले, या खेळाडूने व्यक्त केली खंत

मनोज तिवारीला मंत्रीपदाच्या शुभेच्छा देताना हरभजनने केले धक्कादायक विधान, लगेच हटवले ट्विट

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केली करारबद्ध खेळाडूंची यादी, या दोघांना मिळाली प्रथमच संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---