---Advertisement---

बांग्लादेश दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर! जेसन होल्डरच्या माघारीमुळे ‘या’ खेळाडूला सोपवले कर्णधारपद

On: मंगळवार, डिसेंबर 29, 2020 9:51 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज क्रिकेटच्या निवड समितीने आज बांग्लादेश दौऱ्यासाठीच्या वेस्ट इंडिजच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली. वेस्ट इंडिजचा संघ या दौऱ्यावर ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने चट्टोग्राम आणि ढाका या दोन शहरात खेळवले जातील. या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ १० जानेवारीला ढाक्यात दाखल होईल.

या दौऱ्यातून वेस्ट इंडिजच्या अनेक प्रमुख खेळाडूंनी कोरोना विषाणूच्या भीतीमुळे माघार घेतली. यात जेसन होल्डर, किरोन पोलार्ड, रॉस्टन चेस, शामराह ब्रूक्स, डॅरेन ब्राव्हो, शेल्डन काॅट्रेल इ. खेळाडूंचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या नव्या नियमावलीमुळे खेळाडूंना असे निर्णय घेण्याची मुभा आहे.

मात्र या माघारीमुळे वेस्ट इंडिजच्या संघाचा चेहरा नवखा असून दोन्ही संघांचे कर्णधारपदही नवीन खेळाडूंकडे सोपविण्यात आले आहे.  कसोटी संघाचे कर्णधारपद अनुभवी फलंदाज क्रेग ब्रेथवेट कडे देण्यात आले असून जेरेमिन ब्लॅकवूड या संघाचा उपकर्णधार असेल. वनडे संघाच्या कर्णधारपदाची माळ यापूर्वी वेस्ट इंडिज अ संघाचे नेतृत्व केलेल्या जेसन मोहम्मदच्या गळ्यात पडली आहे. तर उपकर्णधारपदी सुनील अँब्रिसची नियुक्ती झाली आहे.

वेस्ट इंडिजचा कसोटी संघ-

क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जेरेमिन ब्लॅकवूड (उपकर्णधार), जॉन कॅम्पबेल, रहकिम काॅर्नवाॅल, निकृमाह बॉनर, जोशुआ डी सिल्वा, शेनोन गेब्रिअल, काव्हेम हॉज, अल्झारी जोसेफ, कायले मेअर्स, केमार रोच, शेन मोसले, वीरास्वामी परमाॅल, रायमन रेईफर, जोमेल वॅरीकन

वेस्ट इंडिजचा वनडे संघ- 

जेसन मोहम्मद (कर्णधार), सुनील अँब्रिस (उपकर्णधार), निकृमाह बॉनर, जोशुआ डी सिल्वा, चेमार होल्डर, जेहमार हॅमिल्टन, अल्झारी जोसेफ, अकील होईसेन, कायले मेअर्स, आंद्रे मॅकार्थी, किजोर्न ओटले, रॉवमन पॉवेल, हेडन वाॅल्श ज्यु., रायमन रेईफर, रोमरिओ शेफर्ड

महत्वाच्या बातम्या
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---