जूनमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. परंतू सध्या युरोपमध्ये कोरोना व्हायरसला प्रकोप पहाता या मालिकेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा किंवा कॅरिबियन बेटांवर या मालिकेचे आयोजन करण्याचा पर्याय सध्या आहे.
ही मालका ४ जूनपासून सुरु होणार आहे. पण कोरोना व्हायरसचा धोका पहाता सध्या इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिंज क्रिकेट बोर्डमध्ये याबद्दल चर्चा सुरु आहे.
याबरोबरच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने इंग्लंडला जूलैमध्ये पाकिस्तान विरुद्ध होणारी कसोटी मालिकाही कॅरिबियन बेटांवर आयोजिक करण्याची ऑफर दिली आहे. ही ३ सामन्यांची कसोटी मालिका ३० जूलैपासून सुरु होणार आहे.
याबद्दल वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे सीइओ जॉनी ग्रेव्ह यांनी इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार स्पष्ट केले आहे की ते ही मालिका आयोजिक करण्यास तयार आहेत. तसेच त्यांनी असेही स्पष्ट केले की इंग्लंड त्यांचे व्यावसायिक आणि प्रसारण हक्क त्यांच्याकडेच कायम ठेवेल.
ते म्हणाले, ‘आम्ही परिस्थितीचा फायदा घेण्याच्या प्रयत्न करत नाही. हे क्रिकेट समुदायातील प्रत्येकासाठी कठीण वेळी एकत्र काम करण्याबद्दलचा प्रयत्न आहे आणि कॅरिबियनबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही वर्षभर क्रिकेट खेळू शकतो.’
‘कॅरेबियन आणि इंग्लंडमधील क्रिकेट समुदायांमध्ये दीर्घ काळापासून एक विशेष संबंध आहे आणि आम्ही हे स्पष्ट केले आहे की आम्ही सर्वतोपरी मदत करू.’
आता याबद्दल काय निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड घेणार हे पहावे लागेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
–बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ
–टीम इंडियाचा शिलेदार कोरोना व्हायरस संपल्यावर पहिलं हे काम करणार
-इंग्लंडने उचलले मोठे पाऊल, क्रिकेटसाठी नक्कीच निराशाजनक गोष्ट
-कोरोनामुळे टी२० विश्वचषकावर परिणाम होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले हे उत्तर
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब