शनिवारी 28 जुलैला विंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात विंडिजच्या शेल्डन कॉटरेल या वेगवान गोलंदाजाने एक चेंडू इतका बाहेर टाकला की थेट दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने हा चेंडू गेला.
झाले असे की या सामन्याच्या पहिल्या डावात बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज अनमूल हक फलंदाजी करत असताना पहिल्याच षटकाचा पाचवा चेंडू शेल्डनच्या हातून निसटला. त्यामुळे उंच उडालेला चेंडू दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने उडी मारुन झेल पकडत आडवला.
https://www.facebook.com/foxsportsaus/videos/2089133344431794/
या कृतीनंतर शेल्डनने माफीही मागितली. मात्र हा चेंडू पाहून विंडिजच्याच खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच आत्तापर्यंत टाकलेल्या खराब चेंडूपैकी हा चेंडू ठरला आहे. या सामन्यात शेल्डनने 9 षटके गोलंदाजी करताना 59 धावा देत 1 विकेट घेतली.
शनिवारी झालेल्या या सामन्यात विंडिजकडून ख्रिस गेल, रोव्हन पॉवेल आणि शाय होपने अर्धशतके केली. परंतू त्यांना बांगलादेशने दिलेल्या 302 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यात अपयश आले. विंडिजने 50 षटकात 6 बाद 283 धावा केल्या. त्यामुळे त्यांना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.
बांगलादेशकडून या सामन्यात तमीम इक्बालने शतक तर महमुद्दलाहने अर्धशतक करत बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 301 धावांचा टप्पा गाठून दिला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया
–पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया
–‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे