भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत क्वालिफाय होण्यात वेस्ट इंडिज संघ अपयशी ठरला. क्वालिफायर फेरीत स्कॉटलंडविरुद्ध पराभव होताच वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार शाय होप याने संघातील खेळाडूंच्या दृष्टिकोन आणि तयारीवर प्रश्न उपस्थित केले. जून 1975 पासून वनडे विश्वचषकाची सुरुवात झाली होती. मात्र, दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ 48 वर्षांमध्ये पहिल्यांदाच वनडे विश्वचषकाचा भाग नसेल. शनिवारी (दि. 1 जून) सुपर 6 सामन्यात स्कॉटलंडकडून 7 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर वेस्ट इंडिज संघ विश्वचषकासाठी क्वालिफाय करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला.
वेस्ट इंडिज संघाने बॅट आणि चेंडू अशा दोन्ही विभागातून खरा प्रदर्शन केले. शाय होप (Shai Hope) याने वेस्ट इंडिज (West Indies) संघ बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मी फक्त एकाच गोष्टीवर बोट उचलू शकत नाही. आम्ही निश्चितच स्पर्धेत स्वत:ला निराश केले.”
पुढे बोलताना होप म्हणाला की, “हे वास्तवात वागणुकीबाबत आहे. आम्ही प्रत्येक वेळी आपले योगदान दिले नाही, आम्ही असे फक्त तुकड्यांमध्ये केले. मला वाटते की, क्षेत्ररक्षण हे ऍटिट्यूडबद्दल (वृत्ती) आहे. झेल सुटतात, खराब क्षेत्ररक्षण होते, पण हा खेळाचा भाग असतो.”
“हे मुळापासून सुरू होते, आम्हाला आमच्या देशात चांगली तयारी करायला पाहिजे होती. आम्ही तयारीशिवाय इथे येऊन चांगल्या संघाची अपेक्षा करू शकत नाही. तुम्ही आशा करू शकत नाही की, सकाळी उठून हा संघ अचानक चांगला होईल.”
होप म्हणाला की, “आम्ही निश्चितरीत्या आपल्या डावाची सुरुवात करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आम्हाला माहिती होते की, हे आव्हानात्मक असेल. नाणेफेक नेहमीच महत्त्वाची असते. मात्र, आम्हाला सुरुवातीपासून यापासून मार्ग काढण्याची गरज होती.”
वेस्ट इंडिज संघाचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत. मात्र, त्या सामन्यांचा निकाल महत्त्वाचा ठरत नाही. कर्णधार होप म्हणाला की, “आमचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत आणि आम्हाला विजयाच्या मार्गावर परतण्याची पद्धत शोधण्याची गरज आहे. संघात प्रतिभा आहे, पण आम्हाला सातत्याने प्रदर्शन करण्याची गरज आहे.”
होपने स्पर्धेत बॅटमधून चांगले प्रदर्शन केले. त्याने नेपाळविरुद्ध 132 धावांची खेळी साकारली होती. वेस्ट इंडिजचा पुढील सामना 5 जुलै रोजी ओमान संघाविरुद्ध होईल. (west indies skipper shai hope questioned the attitude of players read here)
महत्वाच्या बातम्या-
‘मी जर भारताकडून खेळलो असतो, तर 1000 विकेट्स…’, पाकिस्तानी गोलंदाजाचे खळबळजनक विधान
मोठी बातमी! वर्ल्डकप क्वालिफायरमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजावर ICCची कारवाई, काय होती चूक?