West Indies T20I Squad: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिका यजमान संघाने 2-1ने जिंकली आहे. तसेच, 25 वर्षांनंतर इंग्लंडला आपल्या देशात वनडे मालिकेत हरवले आहे. आता दोन्ही संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात एका अशा खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे, जो मागील 2 वर्षांपासून टी20 संघातून बाहेर होता.
दोन वर्षांनी दिग्गज परतला टी20 संघात
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (West Indies Cricket Board) इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेसाठी संघात घेतलेला खेळाडू इतर कुणी नसून विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल (Andre Russell) आहे. रसेल 2 वर्षांनंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याने वेस्ट इंडिज संघासाठी अखेरचा टी20 सामना टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेदरम्यान खेळला होता. वेस्ट इंडिजच्या नवीन संघात रसेलसोबत मॅथ्यू फोर्ड यालाही सामील केले गेले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात आपल्या गोलंदाजी प्रदर्शनाने प्रत्येकाला प्रभावित केले होते.
शाय होपला मोठी जबाबदारी
या मालिकेत रोवमन पॉवेल (Rovman Powell) संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच, शाय होप (Shai Hope) याच्याकडे वेस्ट इंडिजच्या वनडे संघाच्या नेतृत्वानंतर टी20 संघाचे उपकर्णधारपदही सोपवले आहे. शाय होपने त्याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध वनडेत ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला आहे.
Squad revealed for West Indies T2️⃣ 0️⃣I Series vs England????????#WIHomeforChristmas #WIvENG pic.twitter.com/b5Cs9wYeC7
— Windies Cricket (@windiescricket) December 9, 2023
पहिल्या तीन टी20 सामन्यांसाठी वेस्ट इंडिज संघ
रोवमन पॉवेल (कर्णधार), शाय होप (उपकर्णधार), रॉस्टन चेज, मॅथ्यू फोर्डे, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काईल मेयर्स, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल , शेर्फेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना- 12 डिसेंबर, केसिंग्टन ओव्हल, बार्बाडोस
दुसरा सामना- 14 डिसेंबर, नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रेनाडा
तीसरा सामना- 16 डिसेंबर, नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रेनाडा
चौथा सामना- 19 डिसेंबर, ब्रायन लारा अकादमी, त्रिनिदाद
पाचवा सामना- 21 डिसेंबर, ब्रायन लारा अकादमी, त्रिनिदाद (west indies t20i squad announced andre russell back in team after 2 year read more)
हेही वाचा-
INDWvsENGW: अवघ्या 80 धावांवर सर्वबाद होताच हरमनप्रीतची आगपाखड, पराभवानंतर म्हणाली, ‘आमचे फलंदाज ना…’
लो स्कोरिंग सामन्यात इंग्लंडचा दिमाखात विजय! मायदेशातीत टी-20 मालिकेत भारत पराभूत






