वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हा सामना होणार आहे. हा सामना एक प्रकारे दोन्ही संघांसाठी ग्रँड फिनाले असणार आहे. कारण दोन्ही संघ प्रत्येकी दोन विजयासह बरोबरीत असून, हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावे करेल.
पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाने भारतीय संघावर 4 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन गडी राखून विजय मिळवत त्यांनी आघाडी घेतली. भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. शनिवारी झालेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवताना तब्बल नऊ गडी राखून विजय संपादन केला. त्यामुळे ही मालिका आता बरोबरीत आली आहे.
या सामन्यात विजय मिळवून यजमान संघ कसोटी व वनडे मालिकेतील पराभवाचे शल्य काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, दुसरीकडे भारतीय संघ हा विजय मिळवून ‘टूर स्वीप’ करेल. हा सामना देखील चौथ्या सामन्याप्रमाणे मोठ्या धावसंख्येचा होऊ शकतो.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
वेस्ट इंडीजची प्लेइंग इलेव्हन –
ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, ओबेद मॅकॉय
(West Indies v India Fifth T20I Both Teams Want Series Win)
महत्वाच्या बातम्या-
“मी पुन्हा टीम इंडियासाठी खेळणार”, इंग्लंडचे मैदान गाजवणाऱ्या पुजाराने व्यक्त केला विश्वास
अर्धशतक झळकावताच जयसवालचा मोठा कारनामा, ‘या’ विक्रमात ‘हिटमॅन’च्या मांडीला मांडी लावून बसला यशस्वी