वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघामध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने ७ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली आहे. परंतु दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघातील खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना एक धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे.
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने वेस्ट इंडिज संघातील २ खेळाडू एकापाठोपाठ एक चक्कर येऊन मैदानात पडले. खाली पडताच त्या बेशुद्धही झाल्या होत्या. ही घटना इतकी गंभीर होती की त्या खेळाडूंना ॲम्बुलन्समधून थेट रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. या खेळाडूंसोबत असे का झाले? अचानक हा प्रकार कसा काय घडला? यामागचे कारण अद्यापही समोर आले नाही. सध्या दोन्हीही खेळाडू रुग्णालयात उपचार घेत आहेत.(West Indies vs pakistan, Aaliyah alleyene and chedean nation collapsed on the field and is strechered)
ही घटना पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरू असताना घडली. या सामन्यात पाकिस्तान संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी १११ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी वेस्ट इंडिज संघातील खेळाडू आलीया एलीन आणि चेडीएन नेशन हे दोघेही अवघ्या १० मिनिटात मैदानावर चक्कर येऊन पडल्या.
Aaliyah Alleyne has been sent to hospital in an ambulance after she collapsed on the cricket field.
The reason is still unknown. #WIvPAK #WIWvPAKW
— Female Cricket (@imfemalecricket) July 2, 2021
Horrifying scenes here during West Indies vs Pakistan Match 😮
A west indies player collapsed on the field and is stretchered off.
The reason is still unknown. #WIvPAK pic.twitter.com/0CvTgw011I
— Female Cricket (@imfemalecricket) July 2, 2021
चक्कर येण्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजांना दिला चोप
वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १२५ धावा केल्या होत्या. यामध्ये आलीया एलीनने नाबाद २ धावा आणि चेडीएन नेशनने ३३ चेंडूमध्ये २८ धावांची खेळी केली होती.
वेस्ट इंडिज संघाने मिळवला विजय
वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना १२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाच्या डावात पावसाने अडथळा निर्माण केला होता. पाऊस येईपर्यंत पाकिस्तान संघाने १८ षटकात ६ गडी बाद १०३ धावा केल्या होत्या. त्यामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने ७ धावांनी विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या-
धवन ब्रिगेडला ‘दुय्यम दर्जा’चा संघ संबोधणाऱ्या क्रिकेटरला श्रीलंका बोर्डाचे सणसणीत उत्तर
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
ओहो! एका बोटावर बॅट बॅलन्स करण्याच्या आवाहनात अनुष्काची विराटला काट्याची टक्कर, Video व्हायरल