दुलीप ट्रॉफी 2023 साठी पश्चिम विभागाचा संघ जाहीर करण्यात आला. गुजरातचा कर्णधार प्रियांक पांचाल याला संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून, ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या संघात अनेक नामांकित खेळाडू असून त्यातील बऱ्याच खेळाडूंची या स्पर्धेतील कामगिरीनंतर भारतीय संघात वर्णी लागू शकते.
एका आघाडीच्या वृत्तपत्राने याबाबत वृत्त देताना लिहिले, या संघात मुंबईचे सलामीवीर पृथ्वी शॉ व यशस्वी जयस्वाल यांचा समावेश केला गेला आहे. तसेच मागील दोन रणजी ट्रॉफी गाजवणारा सर्फराज खान हा देखील संघाचा भाग असेल. याव्यतिरिक्त महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा संघाची फलंदाजी मजबूत बनवेल. यशस्वी व गायकवाड यांना या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याची संधी असेल.
संघाच्या गोलंदाजी विभागात मुंबईचा शम्स मुलाणी, सौराष्ट्राचा धर्मेंद्र जडेजा, अतित सेठ, अर्झान नागवासवाला यांचा समावेश आहे. मागील वेळी झालेल्या या स्पर्धेत पश्चिम विभागाने विजेतेपद पटकावण्यात यश मिळवलेले.
दुलीप ट्रॉफीचा (Duleep Trophy) आगामी हंगाम 28 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी हा हंगाम 28 जून ते 16 जुलै दरम्यान खेळवला जाईल. तसेच, पूर्ण वेळापत्रक आणि स्थळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करू शकते.
दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाचा संघ –
पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, प्रियांक पांचाल (कर्णधार), हार्विक देसाई, हेत पटेल, अर्पित वसावडा, अतित शेठ, शमृस मुलानी, युवराज डोडिया, धर्मेंद्र जडेजा, चेतन साकरीया, चिंतन गजा, अर्झान नागवासवाला.
(West Zone Team For Duleep Trophy Shaw Jaiswal Ruturaj In Team)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा