इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली. या संपूर्ण मालिके दरम्यान जार्वो हे नाव प्रचंड चर्चेत राहिले आहे. जार्वो तोच व्यक्ती आहे, ज्याने तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चौथ्या कसोटी सामन्यात त्याला मैदानाबाहेर घेऊन गेल्यानंतर त्याच्यासोबत काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर जाणून घेऊया.
कोण आहे जार्वो?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिके दरम्यान मैदानात घुसणारा जार्वो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. तो भारतीय संघाचा समर्थक असल्याचे सर्वांना सांगतो. तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान तो भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. तसेच तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील गेला होता.
त्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना तो भारतीय संघाची जर्सी घालून बॅट घेऊन मैदानात देखील गेला होता. तसेच ओव्हल कसोटी सामना सुरू असताना देखील त्याने मैदानात घुसून थेट गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने जॉनी बेअरस्टोला जोरदार धडक दिली होती. ज्यामुळे त्याला सेक्युरीटी गार्ड मैदानाबाहेर घेऊन गेले होते.
मैदानाबाहेर घेऊन गेल्यावर जार्वो सोबत काय झाले?
जार्वो एक प्रसिद्ध यूट्यूबवर आहे. त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्याला मैदानाबाहेर घेऊन जात असल्याचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये ओव्हल मैदानावरील सेक्युरीटी गार्ड त्याला मैदाना बाहेर घेऊन जाताना दिसून येत आहे. तसेच मैदानाबाहेर घेऊन गेल्यानंतर त्या गार्डने जार्वोला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यादरम्यान सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील जार्वो सोबत सेल्फी काढताना दिसून येत होते. सतत मैदानात घुसखोरी करत असल्यामुळे जार्वोला पोलिसांनी अटक केली होती.(What happened with jarvo, watch this behind the scene video)
जार्वो सतत मैदानात येत असल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या सुरक्षा व्ययवस्थेवर आणि व्यवस्थापकांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. लॉर्ड्सच्या मैदानात सामना सुरू असताना घुसखोरी केल्यामुळे जार्वोवर कारवाई करण्यात आली होती. त्याला त्या मैदानावर सामना पाहण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. तसेच त्याच्यावर दंड ठोठावला गेला होता. परंतु तरीदेखील ओव्हल कसोटी सामना पाहण्यासाठी त्याला परवानगी कशी मिळाली हा प्रश्न इंग्लंड क्रिकेट बोर्डला विचारण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
नातं तुटलं! शिखर धवनने घेतला पत्नी आयेशापासून घटस्फोट; सोशल मीडियावरून दिली माहिती
कोहलीच्या नेतृत्वापासून ते रोहितच्या शतकापर्यंत, ‘ही’ आहेत ऐतिहासिक विजयामागील ५ प्रमुख कारणे