---Advertisement---

‘हे’ 2 दिग्गज संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? नेमकं कारण काय?

---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स 2025 ट्रॉफीचे नववे वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू केली होती. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी संघांचे 4-4 चे दोन गट करण्यात आले आहेत. पहिल्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश आहेत, तर दुसऱ्या संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

पण या स्पर्धेमध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांसारख्या दिग्गज संघाचे नाव कुठेच दिसले नाही. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघांची निवड नक्की कशी केली. याबद्दल जाणून घेऊया.

1998 मध्ये जेव्हा पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा 9 संघांना कसोटी सामना खेळण्याची मान्यता होती. परंतु, बाद फेरीच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या 2 संघात प्रिलिमिनरी सामना झाला, ज्यात विजय मिळवून किवी संघाने बाद फेरीपूर्वी होणाऱ्या सामन्यात प्रवेश केला.

या सर्व गोष्टींना 25 वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आता होणाऱ्या संघ निवडण्याचा प्रक्रियेत आणि पूर्वीच्या प्रक्रियेत खूप फरक पडला आहे.

2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निर्णय घेतला गेला तेव्हा अशी घोषणा करण्यात आली होती की, या स्पर्धेत तेच 8 संघ पात्र असतील, जे 2023च्या वनडे विश्वचषकाचा शेवट झाल्यानंतर पहिल्या 8 स्थानवरती असतील. विश्वचषक सेमीफायनलमध्ये स्थान मिळवून भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले होते. त्याचबरोबर बाकी 4 संघांची निवड गुणसारणी प्रमाणे करण्यात आली.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेऐवजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पात्र ठरलेले संघ पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश हे आहेत.

2023च्या विश्वचषकाच्या गुणतालिकेत श्रीलंका संघ नवव्या स्थानावरती होता. यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये श्रीलंका संघ पात्र ठरला नाही. वेस्ट इंडिज संघ 2023च्या विश्वचषकात देखील स्थान मिळवू शकला नाही, म्हणून हा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दिसणार नाही.

महत्वाच्या बातम्या:

Champions Trophy; ग्रुप ‘ब’ मधून कोण खेळणार सेमीफायनल? या दोन संघांचा दबदबा!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेपेक्षा आयपीएल खेळाडूंना जास्त पगार! पहा यादी
Champions Trophy; चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ दुबईला रवाना…! VIDEO

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---