भारत-बांगलादेश यांच्यातल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसानं खोळंबा घातला, ज्यामुळे खेळ लवकर संपवावा लागला. आता दुसऱ्या दिवशीही पावसामुळे अद्याप खेळ सुरू झालेला नाही. अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतोय की, जर हा सामना पावसामुळे ड्रॉ झाला, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत याचा काय प्रभाव पडेल?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या WTC च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचे 71.67 टक्के गुण आहेत. तर बांगलादेशचा संघ 39.29 टक्के गुणांसह सहाव्या स्थानी आहे. जर भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला, तर त्याचा फायदा भारतापेक्षा जास्त बांगलादेशला होईल.
वास्तविक, भारतीय संघ हा कसोटी सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. कानपूर कसोटी सामना ड्रॉ झाला तर भारताला बांगलादेश सोबत गुण वाटून घ्यावे लागतील. कसोटी सामना ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना 4-4 गुण मिळतात, तर विजेत्या संघाला 12 गुण मिळतात. जर हा सामना ड्रॉ झाला, तर भारताच्या खात्यात 68.18 टक्के गुण होतील. परंतु जर भारतीय संघानं हा सामना जिंकला, तर भारताचे 74.24 टक्के गुण होतील. अशा परिस्थितीत ड्रॉ मुळे टीम इंडियाचं मोठं नुकसान होऊ शकतं.
बांगलादेश बद्दल बोलायचं झाल्यास, कानपूर कसोटी ड्रॉ झाली तर त्यांचे 38.54 टक्के गुण होतील. जर बांगलादेशचा विजय झाला, तर त्यांचे 46.87 टक्के गुण होतील. अशा परिस्थितीत ते टॉप 4 मध्ये आपली जागा निश्चित करतील. मात्र याची शक्यता फार कमी आहे.
अशाप्रकारे, कानपूर कसोटी ड्रॉ झाल्यास भारताचं जास्त नुकसान होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला आणखी 8 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताला त्यापैकी कमीत कमी 5 सामने जिंकावे लागतील. भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मैदानावर 5 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
हेही वाचा –
हा गोलंदाज मोहम्मद शमीचा सर्वाेत्तम रिप्लेसमेंट; संजय मांजरेकरांचा धक्कादायक अंदाज
भारताच्या आणखी एका खेळाडूचा रस्ता अपघात, मोठ्या सामन्यातून बाहेर
IPL 2025: रिटेन्शन नियमांबाबत मोठे अपडेट, बेंगळुरूमध्ये बैठकीचे आयोजन, लवकरच होणार घोषणा