भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबाच्या मैदानावर रंगला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत पावसामुळे आतापर्यंत अडचण झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस झाला.
त्यामुळे केवळ 13.2 षटकेच खेळता आली. यानंतर संपूर्ण खेळ दुसऱ्या दिवशी झाला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही पावसाने खोळंबा घातला. तिसऱ्या दिवशी सुमारे 8 वेळा पावसाने खोळंबा घातला. त्यामुळे सामन्यात बराच व्यत्यय आला. त्यानंतर चौथ्या दिवशी पावसाने जवळपास 4 वेळा खेळात व्यत्यय आणला.
आता या सामन्याच्या शेवटच्या म्हणजे पाचव्या दिवशी पाऊस पडणार की नाही? चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की, पाचव्या दिवशी ब्रिस्बेनचे हवामान कसे असेल?
अॅक्युवेदर नुसार, गाबा कसोटीच्या पाचव्या दिवशी पावसाची जवळपास 90 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाचव्या दिवशीही खेळ बिघडू शकतो. दिवसभर आकाश ढगाळ राहू शकते. या काळात किमान तापमान 18 अंश आणि कमाल तापमान 31 अंश असू शकते. सुमारे 13 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर 5 दिवसांचा खेळ संपल्यानंतरही भारतीय संघ या सामन्यात मागे आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 252/9 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश दीप (Akash Deep) संघासाठी नाबाद परतले. दोघांनी 10व्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची भागीदारी रचली.
‘आकाश दीप’ने (Akash Deep) 31 चेंडूत मदतीने 27 धावा केल्या. दरम्यान त्याने 2 चौकारांसह 1 षटकार मारला. तर ‘जसप्रीत बुमराह’ने (Jasprit Bumrah) 27 चेंडूत 10 धावा केल्या. दरम्यान त्याने 1 षटकार मारला. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ 193 धावांनी मागे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर धवनचे गोलंदाजांवर वर्चस्व, झळकावले तुफानी शतक!
जसप्रीत बुमराह, आकाश दीपच्या जोडीने रचला इतिहास! 21व्या शतकाच प्रथमच असे घडले
VIDEO; कोहलीच्या बॅटने आकाश दीपनं ठोकला षटकार! अन् कोहली, रोहितसह गंभीरचा आनंद गगनात मावेना