गयाना। आजपासून(8 ऑगस्ट) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज(8 ऑगस्ट) प्रोविडन्स स्टेडीयमवर होणार आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध टी20 मालिकेतील 3-0 अशा विजयानंतर भारतीय संघ या वनडे मालिकेची सुरुवात करणार आहे. वनडे मालिकेसाठी केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी हे संघात सामील झाले आहेत.
त्याचबरोबर भारतीय संघ या वनडे मालिकेत चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताकडे या क्रमांकावर फलंदाजीसाठी केएल राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत असे पर्याय आहेत.
तसेच या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेलही सामील झाला असून ही वनडे मालिका त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जेसन होल्डर वेस्ट इंडीजचा कर्णधार असणार आहे.
या सामन्यात सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. पण नंतर जसा दिवस पुढे जाईल तशी पावसाची शक्यता कमी होणार आहे.
आत्तापर्यंत या दोन संघांमध्ये 127 वनडे सामने झाले आहेत. यातील 60 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर 62 सामन्यात वेस्ट इंडीजने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 2 सामने बरोबरीत सुटले आहेत आणि 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
आज वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…
कधी होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना आज(8 ऑगस्ट) होणार आहे.
किती वाजता सुरु होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.
कुठे होणार आहे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना प्रोविडेन्स स्टेडियम, गयाना येथे होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना सोनी नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना सोनीलीव (SonyLIV) या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ-
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज – एव्हिन लुईस, ख्रिस गेल, शाय होप (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, जेसन होल्डर (कर्णधार), रोस्टन चेस, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, शेल्डन कोटरल, ओशान थॉमस, जॉन कॅम्पबेल, फॅबियन ऍलन, केमार रोच.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष: का देतो रॉजर फेडरर बॉलबॉयला पिझ्झा पार्टी?
–वाढदिवस विशेष: फॅब-४ मधील केन विलियम्सनबद्दल माहित नसलेल्या या ५ गोष्टी
–विंडीज विरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…