---Advertisement---

केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत-न्यूझीलंड दुसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

On: शुक्रवार, नोव्हेंबर 19, 2021 11:40 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला होता. आता शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. दुसरीकडे न्यूझीलंड संघ या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच रवी शास्त्रींचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका दोघांसाठीही महत्त्वाची आहे.

आत्तापर्यंत भारत आणि न्यूझीलंड संघात १८ टी२० सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील भारताने ९ आणि न्यूझीलंडने ८ सामने जिंकले आहेत. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊ.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही – 

१. केव्हा आणि कुठे होईल भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना?
-भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडणार आहे. हा सामना रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्पेक्स येथे पार पडणार आहे.

२. किती वाजता सिरी होईल भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२० सामना ?
-भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामनाभारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ६:३० वाजता होईल.

३. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२० सामना कुठे पाहू शकाल लाईव्ह?
-भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर लाईव्ह पाहू शकता.

४. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?
-तुम्ही डिस्नी + हॉटस्टार ॲपवर भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२० सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. तसेच सामन्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही www.mahasports.in वर देखील मिळवू शकता.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ – 

भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान, इशान किशन, ऋतुराज गायकवाड

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), टॉड ऍस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने, ईश सोधी, जेम्स नीशम

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ती आली आहे का?’ लाईव्ह सामन्यात दिपक चाहरचा स्टँडमध्ये बसलेल्या बहिणीला प्रश्न, व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी! टिम पेन तडकाफडकी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार, ‘या’ गंभीर आरोपांमुळे घेतला निर्णय

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळू शकते पदार्पणाची संधी, पाहा संभावित टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---