भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही विरोधी संघांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यातच वेगवान गोलंदाज अशोक डिंडाने सचिनला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. त्याला सचिनला स्लेज करणे चांगलेच महागात पडले आहे. हा किस्सा भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताने सांगितला आहे.
झाले असे की, २००७च्या रणजी ट्रॉफी हंगामात बंगाल विरुद्ध मुंबई सामन्यादरम्यान हा प्रसंग घडला. दासगुप्तांनी ‘युवा गोलंदाज अशोक डिंडा सचिनला खुन्नस देत होता तर त्याला कशाप्रकारे त्याच्या या प्रतीक्रियेचे उत्तर मिळाले’, हे स्पष्ट केले आहे.
रणजी ट्रॉफी २००७चा अंतिम सामना मुंबई विरुद्ध बंगाल यांच्यात रंगला. मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), झहीर खान, अजित आगरकर, वसीम जाफर आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) अशा तगड्या खेळाडूंचा समावेश होता. दुसरीकडे बंगालच्या संघात कर्णधार दीप दासगुप्ता आणि अशोक डिंडा (Ashok Dinda) हे नवखे खेळाडू होते.
दासगुप्ता म्हणाले, “आम्ही नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. खेळपट्टी ओली झाल्याने मुंबईच्या विकेट्स पडत होत्या. दोन विकेट्स लवकर पडल्यावर सचिन फलंदाजीला आला. तो डिंडाचा पहिलाच हंगाम होता, तसेच तो वेगाने गोलंदाजी करत होता. मी त्याला आधीच सांगितले होते की सचिनला फक्त गोलंदाजी करायची आहे. त्यावेळी डिंडाला सवय होती, फलंदाजांना चकवण्यासाठी तो २-३ पावले पुढे जात त्यांना खुन्नस द्यायचा. मी त्याला सांगितले होते सचिनला असे नको करू.”
“डिंडाचा एक चेंडू सचिनच्या हाताला लागला, तर त्यानंतर तो सचिनकडे पाहात होता. मी म्हटले हे काय करत आहे. मी त्याला परत जायला सांगितले. त्यानंतर सचिनने ८० धावा का शतक काहीतरी केले, म्हणुनच मी सांगत होतो सचिनपासून सावध राहा,” असेही दासगुप्ताने पुढे म्हटले आहे.
मुंबईने तो सामना १३२ धावांनी जिंकला होता. त्यामध्ये सचिनने पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ४३ धावा केल्या होत्या. तर डिंडाला एकच विकेट मिळाली होती. त्याने रोहितला त्रिफळाचीत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डिव्हिलियर्सला विसरायला लावणारा स्टब्स आहे तरी कोण? २८ बॉलवर उडवला ७२ धावांचा धुरळा
‘चल बापू अब गिल्ली पे आ जा’, संजूची यष्टीमागून धोनी स्टाईल फटकेबाजी; सोशल मीडियावर चर्चा
त्रिनिदादमध्ये भारताचे जास्त सामने घेतल्याने संतापला कॅरेबियन दिग्गज; म्हणाला, “काय गरज होती ?”