---Advertisement---

पहा व्हिडीओ- तेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलोव ऑन वाचवला होता!

On: रविवार, एप्रिल 26, 2020 10:15 AM
---Advertisement---

३० वर्षांपूर्वी ३० जुलै १९९० रोजी भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देवने इंग्लड विरुद्ध इंग्लंडमध्ये ४ चेंडूत ४ षटकार खेचून भारताला फॉलोव ऑन पासून वाचवले होते.

इंग्लंडमध्ये झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा लॉर्ड मैदानावर झाला. पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाने १६२ षटकांत ६५३ धावांचा डोंगर उभा केला.

पहिल्या डावात भारताने ९ विकेट्सवर ४३० अशी मजल मारली होती आणि भारताला फॉलोव ऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती. मैदानात कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी ही जोडी होती.

त्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला ४ चेंडूत सलग ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच षटकात हिरवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाले परंतु भारताने १ धावेने इंग्लंड विरुद्ध फॉलोव ऑन टाळला.

भारत या सामन्यात पुढे २४७ धावांनी पराभूत झाला. परंतु कपिल देव यांची ही खेळी आजही चाहते विसरले नाहीत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि हा सचिनचा केवळ ८वा सामना होता तर भारतीय संघाचा कर्णधार होता मोहम्मद अझरुद्दीन.

त्या सामन्यातील धावफलक:

इंग्लंड:
पहिला डाव: ६५३/४ घोषित
दुसरा डाव: २७२/४ घोषित

भारत:
पहिला डाव: ४५४ सर्वबाद
दुसरा डाव: २२४ सर्वबाद

इंग्लंडने हा सामना २४७ धावांनी जिंकला.

खास लेख-

भारताच्या आजी- माजी क्रिकेटपटूंमध्ये हे ५ खेळाडू पाळतात अंधश्रद्धा

आपल्या गोलंदाजीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणारे ५ भारतीय क्रिकेटर्स

वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच

करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment