क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये वातावरण महत्वाची भूमिका बजावत असते. नुकताच सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पाऊस अडथळा निर्माण करत आहे. परंतु सकारात्मक बाब अशी की, पाचव्या आणि अंतिम दिवशी या सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाला नाही. त्यामुळे आता सहाव्या अर्थातच राखीव दिवसावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
महत्त्वाचे म्हमजे, क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा असे घडले आहे, जेव्हा महत्वाच्या सामन्यात पावसाने प्रवेश केला होता. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात २००२ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले होते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा निकाल राखीव दिवशीच्या खेळावरुन ठरवण्यात येणार आहे. हे पहिल्यांदा घडत नाहीये की, भारतीय संघ राखीव दिवशी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी देखील भारतीय संघासोबत असा प्रकार घडला आहे. जेव्हा भारतीय संघाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात राखीव दिवस उपलब्ध असताना देखील सामन्याचा निकाल लागला नव्हता. त्यानंतर दोन्ही संघाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते. हा सामना २९ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला होता.
या सामन्यात श्रीलंका संघाकडून, कर्णधार सनथ जयसुर्या आणि कुमार संगकारा या दोघांनी तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने ५ बाद २४४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला २ षटकात १४ धावा करण्यात यश आले होते.हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
त्यानंतर राखीव दिवशी पुन्हा एकदा श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८.४ षटकात, १ बाद ३८ धावा केल्या होत्या. यावेळीही पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सामन्याच्या निकाल लागला नव्हता. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ स्पर्धेत संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या –
राखीव दिवसावर ओढावणार का ‘काळ्या ढगांचं संकट’?, पाहा साउथम्पटनच्या हवामानाचे अपडेट
तोच चेंडू, तिच विकेट अन् तेच सेलिब्रेशन; मोहम्मद शमीच्या ‘त्या’ विकेटने आठवला २०१६चा सामना
सेव्ह द डेट विथ क्रिकेट! आज रंगणार ९ क्रिकेट सामन्यांचा थरार, WTC फायनलचाही लागेल निकाल