---Advertisement---

खेळासाठी काहीही! जेव्हा पाण्याने भरलेल्या खेळपट्टीवर सचिनने केली होती फटकेबाजी, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं क्रिकेट प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. दोन दशकाच्या लांब कारकिर्दीनंतर सचिनने निवृत्ती घेतली होती. पण तरीही, सचिनचे क्रिकेट वेड अजून संपलेले नाही. अजूनही सचिन आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत कधीकधी क्रिकेट खेळताना दिसून येतो.

काहीवर्षांपूर्वी सचिनने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्याच्यामध्ये आपली फलंदाजी सुधावारी यासाठी सचिनची सराव करतानाची मेहनत दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, पाण्याने भरलेल्या खेळपट्टीवर सचिन फलंदाजी करतो आहे. ह्या फलंदाजीमध्ये सचिन लेदर चेंडू नव्हे तर, टेनिस चेंडूविरुद्ध फलंदाजीचा सराव करताना दिसला आहे. हा सचिनचा जुना व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिनने 27 सप्टेंबर 2019 रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. त्याला त्याने कॅप्शन दिले होते की ‘खेळाबद्दल जर प्रेम आणि आवड असेल तर, सरावासाठी नवीन नवीन योजना सहज मिळतात’.

सचिन काही महिन्यांपूर्वी रायपूर येथे झालेल्या ‘वर्ल्ड रोड सेफ्टी’ मालिकेत खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याने ‘इंडिया लेजेंड्स’ संघाचे नेतृत्व केले होता. या संघामध्ये सचिन सोबत विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इरफान पठाण हे दिग्गज खेळाडूसुद्धा होते. ही स्पर्धा इंडिया लेजेंड्सने श्रीलंका लेजेंड्सला पराभूत करून ही जिंकली होती.

या स्पर्धेनंतर सचिनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तो काहीदिवस दवाखान्यातही दाखल झाला होता. परंतु आता तो पुर्णपणे बरा झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिली टेस्ट चॅम्पियनशीप तोच संघ जिंकेल जो ‘ही’ गोष्ट उत्तम करेल, ब्रेट लीने मांडले मत

पहिला सामना खेळत असलेल्या रॉबिन्सनची कारकीर्द धोक्यात? आठ वर्षांपूर्वीच्या ट्विटने आला अडचणीत

‘या’ खेळाडूकडून धोनी घेतो नेतृत्व करताना सल्ला, ऋतुराज गायकवाडने सांगितले नाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---