---Advertisement---

कधी आणि कुठे पाहू शकाल आयपीएल २०२२ रिटेंशन प्रक्रिया? जाणून घ्या एका क्लिकवर

On: मंगळवार, नोव्हेंबर 30, 2021 10:57 AM
IPL Auction
---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. मंगळवारी (३० नोव्हेंबर) आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी सर्व संघांनी कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येणार आहे. आतापर्यंत माध्यमांमध्ये अंदाज व्यक्त केला जात होता की, कुठल्या खेळाडूंना संघात कायम केले जाऊ शकते. परंतु मंगळवारी सर्व संघांना अंतिम यादी जाहीर करायची आहे. अनेकांना या रिटेंशन प्रक्रियेबाबत माहीत नसेल. या प्रक्रियेबाबत अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया

१. आयपीएल रिटेंशन प्रक्रियेत किती संघ घेणार सहभाग?
आयपीएल स्पर्धेतील सर्व १० संघ या रिटेंशन प्रक्रियेत सहभाग घेणार आहेत. तसेच ते कायम केलेल्या ४-४ खेळाडूंची यादी जाहीर करणार आहेत. तसेच स्पर्धेतील दोन नवीन संघ अहमदाबाद आणि लखनऊ यांना ३-३ खेळाडू आपल्या संघात घेता येणार आहे.

२. किती खेळाडूंना कायम करता येऊ शकते?
सर्व जुने ८ संघ चार खेळाडूंना (२ भारतीय, १ परदेशी ) कायम करू शकतात. हे चार खेळाडू कॅप्ड (आंतरराष्ट्रीय खेळलेले) आणि अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय न खेळलेले) असे दोन्ही असू शकतात. दोन नवीन संघ तीन खेळाडूंना (२ भारतीय,१ परदेशी) संघात घेऊ शकतात.

३. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघ जास्तीत जास्त किती रुपये खर्च करू शकतात?
आयपीएल २०२२ लिलावात सर्व संघ ९० कोटी रुपये खर्च करू शकतात

४. किती किमतीत खेळाडूंना केले जाऊ शकते कायम?
समजा एखाद्या संघाला चार खेळाडू कायम करायचे असतील, तर पहिल्या खेळाडूवर १६ कोटी, दुसऱ्या खेळाडूवर १२ कोटी रुपये खर्च करू शकतात.तर तिसऱ्या खेळाडूवर ८ कोटी आणि चौथ्या खेळाडूवर ४ कोटी रुपये खर्च करू शकतात. परंतु, जर कुठल्या संघाला ३ खेळाडूंना कायम करायचे असेल तर ते, पहिला खेळाडू १५ कोटी,दुसरा खेळाडू ११ कोटी आणि तिसऱ्या खेळाडूला ७ कोटी रुपयात कायम करू शकतात.

जर कुठल्या संघाला २ खेळाडूंना कायम करायचे असेल, तर ते पहिल्या खेळाडूला १४ कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला १० कोटी रुपयांत कायम करू शकतात. तसेच एकाच खेळाडूला कायम करण्यासाठी सर्व संघांना १४ किती रुपये खर्च करावे लागतील.

५. नवीन २ संघ कसे करणार खेळाडूंना कायम?
ज्यावेळी जुने संघ आपल्या कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करतील त्यानंतर,उर्वरित खेळाडूंपैकी नवीन संघ ३-३ खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतात.

६. कुठे पाहू शकाल हा रिटेंशन प्रक्रिया लाईव्ह?
रिटेंशन प्रक्रिया मंगळवारी रात्री ९:३० वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. तसेट हॉटस्टार या ऍपवर थेट प्रसारण होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

करन की मोईन? कोण बनला सीएसकेचा रिटेन होणारा चौथा खेळाडू? घ्या जाणून

मुंबई कसोटीत अजिंक्य खेळणार का? राहुल द्रविड यांचे सूचक वक्तव्य

कोलकाताचे रिटेन केले ‘हे’ नाईट रायडर्स; कर्णधार ओएन मॉर्गनला नारळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---