---Advertisement---

तीन संघांचे भविष्य एका सामन्यावर ठरणार; जाणून घ्या अफगानिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 9:42 AM
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुपर-१२ फेरीतील सामने आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत ३ संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर रविवारचा (७ नोव्हेंबर) दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ कुठला असेल? याचा निकाल यादिवशी लागणार आहे.

रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि आफगानिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याच्या निकालावरून भारत, अफगानिस्तान आणि न्यूझीलंड संघाचे भवितव्य ठरणार आहे. ग्रूप-१ मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. तर ग्रूप-२ मधून पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जर न्यूझीलंड संघाने या सामन्यात विजय मिळवला तर, न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. जर अफगानिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर, त्यांना हा सामना मोठ्या अंतराने जिंकावा लागणार आहे. तसेच त्यांच्या विजयाचा फायदा हा भारतीय संघाला होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या सामन्यावर टिकून आहे.

केव्हा खेळला जाईल अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना?
अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ४० वा सामना रविवारी (७ नोव्हेंबर) पार पडणार आहे.

कुठे खेळला जाईल अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना?
अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक लढत अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर पार पडणार आहे.

किती वाजता सुरू होईल अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना?
अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ३:०० वाजता होईल.

कुठे पाहू शकाल अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना लाईव्ह?
अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भाषांमध्ये पाहू शकता.

ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहू शकाल?
जर तुमच्याकडे सबस्क्रीप्शन असेल तर तुम्ही हा सामना डिज्नी+ हॉटस्टारवर पाहू शकता. तसेच सामन्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही http://www.mahasports.in वर मिळवू शकतात.

अशी असू शकते अफगानिस्तान संघाची प्लेइंग ईलेव्हन
हजरतुल्लाह जजई, मोहम्मद शहज़ाद (यष्टिरक्षक), रहमानुल्लाह गुरबाज, गुलबदीन नायब, नजीबुल्लाह जदरान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनत, राशिद ख़ान, शरफ़ुद्दीन अशरफ़/मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, हामिद हसन

अशी असू शकते न्यूझीलंड संघाची प्लेइंग ईलेव्हन
मार्टिन गप्टिल, डॅरिल मिचेल, केन विलियमसन (कर्णधार), डेवन कॉनवे, ग्लेन फ़िलिप्स, जेम्स नीशम, टिम सीफर्ट (यष्टिरक्षक), मिशेल सॅंटनर, ॲडम मिलने, ईश सोढ़ी, ट्रेंट बोल्ट

महत्त्वाच्या बातम्या-

AFG v NZ : ‘निकाल काहीही येवो..’ अमिताभ यांच्या ट्विटमुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या विचारांत बदल

कागिसो रबाडाने रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध २०व्या षटकात घेतली ‘हॅट्रिक’, विक्रमांची घातली रास

‘हॅट्रिकवीर’ रबाडाची लिविंगस्टोनने केली धुलाई, सलग ३ षटकार ठोकताना मारला टूर्नामेंटमधील सर्वात लांब सिक्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---