---Advertisement---

‘भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा’, म्हणणारे रमीज राजा ट्रोल; नेटकरी म्हणाले, चुना लगा गया रे!

On: मंगळवार, ऑक्टोबर 26, 2021 7:40 AM
---Advertisement---

रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. गेल्या कित्येक महिन्यांपासून या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि अखेर तो दिवस उजाडला. परंतु भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. पाकिस्तान गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांनी रमीज राजा यांच्याकडे एका खास गोष्टीची मागणी करायला सुरुवात केली आहे, ज्याचे भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी म्हटले होते की, जर पाकिस्तान संघ भारतीय संघाला पराभूत करेल तर त्यांना एक रिकामा चेक दिला जाणार आहे. ही बाब रमीज राजा यांनी स्वतः मीडियासमोर येऊन देखील म्हटली होती. मग आता तो रिकामा चेक कुठेय? आणि तो गुंतवणूकदार कुठेय? असे प्रश्न आता सोशल मीडियाद्वारे विचारले जाऊ लागले आहेत.

एका यूजरने रमीज राजा यांना टॅग करत लिहिले की, “रमीज राजा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की, कृपया करून त्या गुंतवणूकदाराला संपर्क करा ज्यांनी भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर रिकामा चेक देण्याची घोषणा केली होती.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “आम्ही पाकिस्तानी त्या रिकाम्या चेकची वाट पाहतोय. कुठे आहे तो गुंतवणूकदार.” तसेच आणखी एका युजरने गोलमाल चित्रपटातील “चुना लगा गया” मिम्स शेअर करत लिहिले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेव्हा पाहणार रिकामा चेक तेही सही शिवाय,” असे आणखी भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तसेच भारत – पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती. रिषभ पंतने ३९ आणि रवींद्र जडेजाने १३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ७९ आणि बाबर आजमने ६८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या-

आजपर्यंत टी२० मध्ये कधीही न केलेली ‘अशी’ नकोशी कामगिरी स्कॉटलंडने केली अफगाणिस्तानविरुद्ध

तीन टी२०, ५ दिवस अन् १५ मिलीयन डॉलर बक्षीस! पीटरसनने भारत-पाकिस्तान मालिकेबद्दल मांडली अनोखी कल्पना

कडक ना भावा! हवेत झेपावत अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शहजादने घेतला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---