---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या २ फिरकीपटूंना खेळवावे? प्रशिक्षक द्रविडने दिले उत्तर

On: शनिवार, जुलै 31, 2021 12:38 PM
---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका नुकतीच पार पडली आहे. यामध्ये एकदिवसीय मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली; तर टी २० मालिकेत १-२ ने भारतीय संघाचा पराभव झाला. येत्या काही महिन्यात टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. याच संदर्भात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला आगामी टी२० विश्वचषकासाठी कोणत्याही दोन भारतीय फिरकी गोलंदाजांच्या निवडीबद्दल विचारण्यात आले होते. परंतु राहुल द्रविडने आपली पसंती देण्यास नकार दिला आहे.

राहुल द्रविड हे श्रीलंका दौऱ्यावर प्रशिक्षक भारतीय संघाचे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका खेळली आहे.

भारतीय संघासाठी युझवेंद्र चहलने ५० षटकांच्या स्वरूपामध्ये ५ विकेट्स घेतल्या आणि राहुल चहर, वरुण चक्रवर्ती यांनी टी२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली आहे.

द्रविडला जेव्हा विचारण्यात आले की, टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणता फिरकीपटू निवड निवडणार? तर द्रविड म्हणाला की, “मी कोणत्याही खेळाडूची निवड करणार नाही. मी या संघाचा एकमेव प्रशिक्षक आहे. मी खेळाडूंची जाहीर नावे घेणार नाही. मी एवढेच सांगेन की, सर्वांनीच खरोखर चांगली कामगिरी केली आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, संघामध्ये अशा प्रकारची सखोलता आणि गुणवत्ता आहे. संघ निवडणे हे निवडकर्त्यांचे काम आहे. ज्याची निवड होईल तो खेळाडू खूप चांगला असेल. हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे की, त्यांना खेळाडूंकडून काय हवे आहे आणि काय पहायचे आहे.”

श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी प्रभावीपणे गोलंदाजी केली आहे. पण श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याने तीन टी२० सामन्यात सात विकेट घेतल्याची चर्चा देखील रंगली आहे. “हसरंगाने संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. तो आणि चमीरा या दोघांनीही उत्कृष्ट प्रदर्शन केले,” असे म्हणत द्रविडने त्यांची पाठ थोपटली.

भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर द्रविड म्हणाला की, “गेल्या काही सामन्यांमध्ये आमच्याकडे एक फलंदाज कमी होता. खेळाडूंची खेळण्याची पद्धत माझ्यासाठी सकारात्मक गोष्ट होती. दुसऱ्या सामन्यात आम्ही श्रीलंकेला खूप थकवले होते. फक्त दोन चेंडू आणि आम्ही खरोखरच तो सामना जिंकू शकलो असतो. तिसऱ्या टी२० मध्ये आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आम्ही सुरुवातीला बऱ्याच विकेट गमावल्या होत्या. ८० धावा हे कधीच पुरेसे लक्ष्य नव्हते.”

महत्त्वाच्या बातम्या-

कोहली करणार फायद्याचा सौदा, टीम धवनला सतावणाऱ्या ‘या’ श्रीलंकन क्रिकेटरला देणार आरसीबीत संधी!

‘मिशन इंग्लंड’ फत्ते करण्यासाठी माजी दिग्गजाकडून भारतीय संघाला मिळाला ‘हा’ मोलाचा सल्ला

‘शनाका ब्रिगेड’च्या कामगिरीचे बोर्डाकडून भरभरुन कौतुक, टी२० मालिका विजयासाठी दिले ‘इतक्या’ लाखांचे बक्षीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---