आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणताही सामना असो, खेळाडूंची कामगिरी सर्वात महत्त्वाची असते. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्या कामगिरीवर समालोचक, प्रेक्षक आणि क्रिकेट चाहते लक्ष ठेवून असतात. यामध्ये जो फलंदाज किंवा गोलंदाज चांगली कामगिरी करतो, त्याला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. मात्र, अनेकदा अपेक्षा नसतानाही एखाद्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. प्रत्येक क्रिकेट चाहता आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला सामनावीर पुरस्कार मिळण्याची वाटच पाहत असतो.
अनेकदा असे होते की, विजय मिळवणाऱ्या संघाचा खेळाडू सामनावीर पुरस्कार (Player of the Match Award) पटकावतो. याव्यतिरिक्त अनेकदा असेही होते की, एखादा संघ विजयी झाला असेल आणि त्यांच्या खेळाडूने चांगली कामगिरी केली असेल, तरीही विरोधी संघ पराभूत होऊनसुद्धा त्यांच्या खेळाडूला सर्वोत्तम खेळाडू घोषित केले जाते. अशात प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की, क्रिकेटमध्ये सामनावीर कोण निवडतं?
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, सामनावीराची निवड ते लोक करतात, ज्यांनी संपूर्ण सामना चांगल्याप्रकारे पाहिला असेल आणि त्याचे विश्लेषण केले असेल. समालोचकांचे लक्ष संपूर्ण सामन्यावर असते, त्यामुळे त्यांच्यापेक्षा चांगले इतर कुणीही सांगू शकत नाही की, सामन्यात कोणत्या वेळी काय घडलं होतं. अशात सामनावीर निवडण्याचा अधिकार त्यांना दिला जातो. परस्पर संमतीने किंवा मतदानाच्या आधारावर समालोचक दोन्ही संघांतील दमदार खेळाडूची निवड करतात.
https://twitter.com/ICC/status/1584158917768224769
अनेकदा खेळाडूच्या कामगिरीचा परिणाम पाहिला जातो. यामध्ये हे पाहिले जाते की, कठीण स्थितीत कुणी सर्वात चांगले प्रदर्शन केले. तसेच, कोणत्या खेळाडूमुळे सामन्याचा कायापालट झाला. याव्यतिरिक्त पराभूत होणाऱ्या संघातून जर कोणता खेळाडू एकटा संघाला विजयाच्या जवळ घेऊन गेला, तर त्याला कौतुकाची थापही मिळते. तसेच, सामनावीर म्हणूनही गौरवले जाते. अनेकदा क्षेत्ररक्षकांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. (who chose the player of the match in international cricket know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता आयसीसीतही वाढले जय शहांच वजन! महत्त्वाचं खातं पडलंय पदरात
आता त्यांची वेळ आली! या दोन नावांपासून सुरू होणार भारतीय संघातील बदलांना सुरुवात?






