AUS vs SA WTC Final: यंदा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होणार आहे. हा सामना लंडनमधील ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनल खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 वेळा आयसीसी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामध्ये संघाने 10 फायनल सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत फक्त 1 आयसीसी फायनल जिंकली आहे.
आफ्रिकेने शेवटचा 27 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून फायनल जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर, प्रोटीज संघाने एकही आयसीसी फायनल जिंकलेली नाही. दक्षिण आफ्रिका सध्या डब्ल्यूटीसी फायनल जिंकण्यासाठी उत्सुक असेल. या विजयासह, ते ‘चोकर्स’ हा टॅग देखील संपवण्याच्या तयारीत असतील.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुनहेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर
WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिका संघ- टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, टोनी डी जियोर्गी, डेव्हिड बेडिंगहॅम, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, सेनुरन मुथुसामी, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, काइल व्हेरेन, डेन पीटरसन, वियान मुल्डर, रायन रिकेलटन






